Mucormycosis : म्युकरमायकोसिसने आतापर्यंत औरंगाबादमध्ये घेतले १०० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 01:44 PM2021-06-09T13:44:55+5:302021-06-09T13:45:05+5:30

Mucormycosis : कोरोनाबाधित व इतरांना हा आजार होत असून, शहर, जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर ठिकाणांहून रुग्ण उपचारासाठी शहरात येत आहेत.

Mucormycosis : 100 deaths of Mucormycosis in the Aurangabad so far | Mucormycosis : म्युकरमायकोसिसने आतापर्यंत औरंगाबादमध्ये घेतले १०० बळी

Mucormycosis : म्युकरमायकोसिसने आतापर्यंत औरंगाबादमध्ये घेतले १०० बळी

googlenewsNext
ठळक मुद्देम्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत.

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी होत आहे, ही दिलासादायक बाब असली तरी म्युकरमायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. दररोज आठ ते दहा नवीन रुग्णांची भर पडत आहे. दिवसभरात दोन ते तीन रुग्णांचा मृत्यू होतोय. 

मंगळवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसात या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा शंभरवर गेला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबाधित व इतरांना हा आजार होत असून, शहर, जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर ठिकाणांहून रुग्ण उपचारासाठी शहरात येत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 

या आजाराने आत्तापर्यंत शंभर जणांचा बळी घेतला आहे. मंगळवारी घाटी रुग्णालयात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. तसेच नव्या १५ रुग्णांची भर पडली आहे. आत्तापर्यंत दाखल झालेल्या ९१० रुग्णांपैकी ५१० जणांची रुग्णालयातून उपचारानंतर सुटी झाली आहे.

Web Title: Mucormycosis : 100 deaths of Mucormycosis in the Aurangabad so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.