मुंबईची महाराष्ट्रावर ४ गडी राखून मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:32 AM2018-01-23T00:32:13+5:302018-01-23T00:32:26+5:30
सिद्धार्थ अक्रे याने झळकावलेल्या शतकी खेळीच्या बळावर मुंबईने वडोदरा येथे २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वनडे लीग क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर ४ गडी राखून मात केली.
औरंगाबाद : सिद्धार्थ अक्रे याने झळकावलेल्या शतकी खेळीच्या बळावर मुंबईने वडोदरा येथे २३ वर्षांखालील पश्चिम विभागीय वनडे लीग क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्रावर ४ गडी राखून मात केली.
महाराष्ट्राने विजयासाठी दिलेले २८६ धावांचे आव्हान मुंबईने ४९.३ षटकांत ६ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून सिद्धार्थ अक्रे याने १२ चौकार व ५ षटकारांसह १४५ व यशस्वी जैस्वाल याने ५७ धावा केल्या. महाराष्ट्राकडून प्रदीप दाढे याने ४४ धावांत ४ गडी बाद केले. तत्पूर्वी, महाराष्ट्राने ५0 षटकांत ७ बाद २८५ धावा ठोकल्या. त्यांच्याकडून इझान सय्यदने ५२, सिद्धेश वरघंटेने ५१, प्रशांत कोरेने ४३ व विजय झोल याने ३८ धावांचे योगदान दिले. महाराष्ट्राचे सलामीवीर ४0 धावांत तंबूत परतल्यानंतर ५ खणखणीत चौकार व एक टोलेजंग षटकार मारणाºया विजय झोल आणि प्रशांत कोरे यांनी तिसºया गड्यासाठी ५0 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सिद्धेश वरघंटे याने ५४ चेंडूंत ७ चौकारांसह केलेली ५१ व इझान सय्यदच्या ४ चौकार व २ षटकारांसह फटकावलेल्या ५२ धावांमुळे महाराष्ट्राला आव्हानात्मक धावसंख्या गाठता आली. मुंबईकडून कर्णधार साईराज पाटील याने ४३ धावांत २ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
महाराष्ट्र : ५0 षटकांत ७ बाद २८५. (इझान सय्यद ५२, सिद्धेश वरघंटे ५१, प्रशांत कोरे ४३, विजय झोल ३८, अथर्व काळे २७. साईराज पाटील ३/४३).
मुंबई : ४९.३ षटकांत ६ बाद २८९. (सिद्धार्थ अक्रे १४५, यशस्वी जैस्वाल ५७. प्रदीप दाढे ४/४४).