पंढरपूरमध्ये खून झालेल्या इसमाची ओळख पटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 11:54 PM2019-12-09T23:54:58+5:302019-12-09T23:55:45+5:30

बजाजनगरात तीन दिवसांपूर्वी पंढरपुरात दगडाने ठेचून खुन झालेल्या तरुणाची ओळख पटविण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना सोमवारी यश आले.

A murder victim was identified in Pandharpur | पंढरपूरमध्ये खून झालेल्या इसमाची ओळख पटली

पंढरपूरमध्ये खून झालेल्या इसमाची ओळख पटली

googlenewsNext

वाळूज महानगर : बजाजनगरात तीन दिवसांपूर्वी पंढरपुरात दगडाने ठेचून खुन झालेल्या तरुणाची ओळख पटविण्यात एमआयडीसी वाळूज पोलिसांना सोमवारी यश आले. प्रकाश रंगनाथ घोगरे (५५ रा. तारुखेडले, ता.निफाड, जि. नाशिक, ह.मु. बजाजनगर) असे मृताचे नाव आहे.

दरम्यान, मृतदेहाची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.


पंढरपुरात शुक्रवारी रात्रीच्या अकरा वाजेच्या सुमारास अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली होती. या अनोळखी इसमाच्या चेहरा छिन्न-विछन्न झाल्यामुळे त्यांची ओळख पटू शकत नव्हती. दरम्यान, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, सहा. निरीक्षक विजय घेरडे, उपनिरीक्षक विठ्ठल चास्कर, सहा.फौजदार राजेश वाघ, पोहेकॉ.वसंत शेळके, वसंत जिवडे, पोना. बाबासाहेब काकडे आदींच्या पथकाने तपास चक्रे वेगाने फिरवित ६ तासांत खुनाचा छडा लावला.

या खूनप्रकरणी सचिन पवार (२२ रा.बकवालनगर) याला पोलिसांनी वैजापूर तालुक्यातील डाग पिंपळगाव येथून अटक केली. घटनेच्या दिवशी शुक्रवारी रात्री अनोळखी इसमाने फोन करण्यासाठी मोबाईल मागितला होता. मात्र, सचिनने मोबाईल न दिल्यामुळे त्या इसमाने शिवीगाळ केली होती.

यामुळे संतप्त झालेल्या सचिन पवारने त्या इसमास मारहाण करीत मोकळ्या मैदानावर घेऊन जात त्याचा दगडाने ठेचून खून केल्याची कबुली सचिन पवार याने पोलिसांना दिली होती.

 

Web Title: A murder victim was identified in Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Walujवाळूज