नामांकित डॉक्टरांच्या नावाखाली गंडा

By Admin | Published: May 18, 2016 12:02 AM2016-05-18T00:02:00+5:302016-05-18T00:16:21+5:30

औरंगाबाद : सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. टाकळकर यांच्या नावाखाली एका भामट्याने फर्निचर विक्रेत्यास गंडा घातला. २४ हजार रुपयांची अंगठी आणि रोख नऊ हजार रुपये, असा ३३ हजारांचा ऐवज घेऊन भामट्याने पोबारा केला.

In the name of a nominated doctor, | नामांकित डॉक्टरांच्या नावाखाली गंडा

नामांकित डॉक्टरांच्या नावाखाली गंडा

googlenewsNext

औरंगाबाद : सिग्मा हॉस्पिटलचे डॉ. टाकळकर यांच्या नावाखाली एका भामट्याने फर्निचर विक्रेत्यास गंडा घातला. २४ हजार रुपयांची अंगठी आणि रोख नऊ हजार रुपये, असा ३३ हजारांचा ऐवज घेऊन भामट्याने पोबारा केला. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतोष सोमाणी (५२, रा. व्यंकटेशनगर) यांचे सेंट फ्रान्सिस हायस्कूलजवळ फर्निचरचे दुकान आहे. ३० एप्रिल रोजी रात्री आठ ते साडेआठ यावेळेत ३० ते ३५ वर्षे वयाचा भामटा सोमाणी यांच्या दुकानात आला. ‘डॉ. टाकळकर यांच्या गाडीचा मी चालक आहे. डॉक्टर साहेबांनी मला पाठविले असून, हॉस्पिटलसाठी आठ फिरत्या खुर्च्या, फायबरच्या ३२ खुर्च्या आणि फर्निचरचा सोफा खरेदी करायचा आहे,’ अशी थाप त्याने मारली. सोमाणी यांनी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फर्निचर दिले. फर्निचरच्या ९१ हजार रुपयांच्या बिलाची सोमाणी यांनी मागणी केली असता, ‘डॉक्टर साहेबांकडे चला, पैसे घेऊन देतो,’असे सांगून रुग्णालयात नेले.
म्हणे अंगठी आवडली
सिग्मा हॉस्पिटलमध्ये येताच भामट्याने सोमाणी यांना डॉ. टाकळकर यांच्या केबिनकडे नेले. भामटा आत गेला व पुन्हा परत आला. तुम्ही ९ हजार रुपये द्या, डॉक्टर तुम्हाला एक लाख रुपये देतील, असे सांगितले. सोमाणी यांनी नऊ हजार रुपये दिले.‘तुमच्या बोटातील अंगठी डॉक्टर साहेबांना खूप आवडली असून, ती माझ्याजवळ द्या, अशी मागणी केली. सोमाणी यांनी २४ हजार रुपयांची आठ ग्रॅमची अंगठीही त्याच्याजवळ दिली. त्याचवेळी सोमाणी यांना संशय आला. आरोपीच्या मागे तेदेखील केबिनकडे निघाले असता, भामट्याने त्यांना धक्का देऊन पोबारा केला.
असा आहे भामटा
३० ते ३५ वर्षे वय, मध्यम बांधा, साडेपाच फूट उंची, असे भामट्याचे वर्णन आहे. भामट्याविषयी माहिती असल्यास जवाहरनगर ठाण्यात संपर्क साधावा.

Web Title: In the name of a nominated doctor,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.