होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेत नारायणाचे विद्यार्थी चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:02 AM2021-03-05T04:02:01+5:302021-03-05T04:02:01+5:30
होमी भाभा बालवैज्ञानीक स्पर्धेत नारायणाचे विद्यार्थी चमकले औरंगाबाद : डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात नारायणा आयआयटी आणि ...
होमी भाभा बालवैज्ञानीक स्पर्धेत नारायणाचे विद्यार्थी चमकले
औरंगाबाद : डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात नारायणा आयआयटी आणि पीएमटी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
ही स्पर्धा मुंबई सायंस टीचर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित केली जाते. दरवर्षी महाराष्ट्रातील ४० हजारांहून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात. या स्पर्धा परीक्षा शालेय मुलांमधील आत्मविश्वास वाढीस सहायक ठरतात, त्यामुळे या स्पर्धांत जास्तीय जास्त विद्यार्थ्यांना सहभागासाठी आम्ही प्रोत्साहित करतो, असे उद्गार डॉ. एम. एफ. मलीक यांनी संस्थेत आय़ोजित सत्कार समारंभादरम्यान काढले.
नववीत शिक्षण घेणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतात. नारायणा फाऊंडेशन कोर्समधील ४ विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र ठरले तर ५३ विद्यार्थ्यांना मेरीट सर्टिफिकेट मिळाले आहे. प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची नावे अशीः वरद गाडेकर , वरद ठोंबरे, अमेया पाथ्रीकर , सागर सुस्ते. यशस्वी विद्यार्थ्यांचा डॉ. एम. एफ. मलीक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. विशाल लदनिया यांनी सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्काॅलरशिप कम एडमिशन टेस्ट २१ मार्च रोजी तर दोन वर्षीय जेईई व नीट अभ्यासक्रमाकरिता स्काॅलरशिप टेस्ट ही ४ एप्रिल रोजी होणार असल्याची घोषणा केली.
यावेळी डॉ. एम. एफ. मलीक, प्रा. विशाल लदनिया, दुर्गेश सिंग, गोधवान सिंग, अब्दुल हन्नान, सुनील झा, प्रदीप शुक्ला, संजय सिंग, प्रशांत शुक्ला, देवदत्त झा, डॉ. अलोक कुमार, जीशान अहमद, संदीप मिश्रा, टी. राव यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
सत्कार समारंभाच्या यशासाठी दत्ता जाधव, राजेश पाटील, जमील खान, प्रकाश पाटील, अब्दुल हफीज, भक्ती देशपांडे, कल्पना नरोडे, नवाज बेग, प्रदीप मिश्रा, चलपती तेताकाली, सुधीर गारु यांनी प्रयत्न केले.
फोटो कॅप्शनः
होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील यशस्वी विद्यार्थ्यांसोबत डॉ. एम.एफ.मलीक .