केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांना ‘निमा’चे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 11:51 PM2017-11-25T23:51:43+5:302017-11-25T23:51:50+5:30
मालवण येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना आयुर्वेद, युनानी पदवीधरांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मालवण येथे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना आयुर्वेद, युनानी पदवीधरांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
मालवण येथे आयुर्वेद प्रोक्टालॉजी असोसिएशन द्वारा मुळव्याध भगंदरकरिता राष्ट्रीय परिषदेचे २४ नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत भारतातील ६३१ च्यावर विविध चिकित्सा पद्धतीच्या डॉक्टरांनी सहभाग घेतला आहे. या परिषदेचे उद्घाटक म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री तथा आयुषमंत्री श्रीपाद नाईक हे होते. यावेळी ‘निमा’तर्फे केंद्र सरकारचे भारतीय चिकित्सा परिषदेच्या डॉक्टरांसाठीच्या ‘ल्लू्र२े ु्र’’ २०१७’ सुधारणा कराव्यात व इतर प्रलंबित मागण्यांसाठी संघटक महाराष्ट्र निमा तथा उपाध्यक्ष आयुर्वेद प्रोक्टालॉजी असोसिएशनचे डॉ.गजानन धाडवे, राज्य प्रतिनिधी निमा महाराष्ट्र तथा संघटक आयुर्वेद प्रोक्टालॉजी असोसिएशनचे डॉ. रमेश घोडके यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
त्यावर आयएसएम पदवीधारकांच्या हक्काचे रक्षण करणार व इतर प्रश्न मार्ग लावणार याचे आश्वासन दिले.