अभिनेते मुकेश खन्ना यांनी सैफवर जोरदार हल्ला चढवत, संताप व्यक्त केला आहे. ‘सैफला रावणाची भूमिका साकारणे इंटरेस्टिंग वाटतेय. आम्ही रावणाची भूमिका मनोरंजक पद्धतीने सादर करू, सीताहरणही न्यायसंगत ठरवू, असे सैफ एका मुलाखतीत म्हणाला. हे इतके सोपे आहे, असे सैफला का वाटतेय? लंकेश काही चेंडू नाही, ज्याला तुम्ही वाट्टेल तसे टोलवाल. याला मी सैफचे अज्ञान म्हणू की मूर्खपणा. तुम्ही कोट्यवधी भारतीयांच्या आस्थेशी खेळत आहात, हेही त्याला कळू नये? हिंमत असेल तर दुसऱ्या धर्माबद्दल असे करून दाखव? चांगल्याला वाईट दाखव, वाईटाला चांगले दाखव. आता म्हणे सैफ माफी मागतोय. व्वा, क्या बात है. बाण सोडा, बॉम्ब फोडा आणि मग सॉरी म्हणा. तुझी सॉरी आम्हाला मान्य नाही. बोलण्यापूर्वी विचार का केला नाहीस? अशा शब्दांत त्यांनी सैफला फटकारले आहे.
नेटकरी म्हणतात, धरम पुतर से ये उम्मीद ना थी !
भाजपा खासदार आणि अभिनेता सनी देओल यांनी ट्वीट करत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘हा शेतकरी आणि सरकारमधील मुद्दा आहे. त्यामुळे या मुद्द्यामध्ये कोणीही हस्तक्षेप करू नये,’असे ट्वीट सनी देओल यांनी केले. मात्र, लोकांना ही प्रतिक्रिया पचनी पडली नाही. मग काय, सनी देओल सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल झाले. अनेकांनी सनी देओल यांना दुटप्पी, डिप्लोमॅटिक म्हटले. अनेकांनी यावरून मिम्सही शेअर केले. सनीजी अब बोले, चलो कुछ तो बोले, असे म्हणत एका युजरने सनी देओल यांना डिवचले. ‘शेतकरी आपली लढाई स्वत: लढेल पाजी, कदाचित तुमच्या हाडांमध्ये पाणी भरलेय,’ अशी कमेंट केली.