आता काही दिवस फक्त दुसरा डोसच मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:06 AM2021-05-05T04:06:53+5:302021-05-05T04:06:53+5:30
महापालिकेने दर आठवड्याला १ लाख लसीची मागणी केली आहे. परंतु सरकारकडून लसीचे केवळ २५ ते ३० हजार डोस दिले ...
महापालिकेने दर आठवड्याला १ लाख लसीची मागणी केली आहे. परंतु सरकारकडून लसीचे केवळ २५ ते ३० हजार डोस दिले जात आहेत. गेल्या आठवड्यात २५ हजार डोस मिळाले होते. ही लस दोन दिवसात संपल्यामुळे शुक्रवारपासून लसीकरण बंद ठेवावे लागले. लस कधी मिळणार याची माहिती नसल्याने नागरिकांनी केंद्रावर येऊ नये असे आवाहनदेखील करण्यात आले. मंगळवारी १२ हजार डोस प्राप्त झाले आहेत. पुणे येथून ही लस आणली जाणार आहे. त्यातून महापालिकेला ६ हजार लस मिळण्याची शक्यता असल्याचे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
पहिला डोस वाया जाऊ नये म्हणून...
पहिला डोस घेतल्यानंतर सहा ते आठ आठवड्यानंतर दुसरा डोस घ्यावा असा नियम आहे. अनेकांनी दुसरा डोस घेतला आहे. परंतु दीड महिन्यापूर्वी पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस घ्यावा लागणार आहे. त्यामुळे दुसरा डोससाठी ६ हजार डोस राखून ठेवण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना दुसरा डोस घ्यावयाचा आहे, अशा नागरिकांनीच मनपाच्या आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी यावे.