पोषण ट्रॅकरच्या ॲपला हवा मराठीचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:02 AM2021-07-30T04:02:01+5:302021-07-30T04:02:01+5:30

-- अंगणवाडी सेविकांची मागणी : इंग्रजीतून माहिती भरण्यासाठी घ्यावी लागते इतरांची मदत, मोजावे लागतात पैसे योगेश पायघन औरंगाबाद ...

Nutrition Tracker's Apple Hawa Marathi option | पोषण ट्रॅकरच्या ॲपला हवा मराठीचा पर्याय

पोषण ट्रॅकरच्या ॲपला हवा मराठीचा पर्याय

googlenewsNext

--

अंगणवाडी सेविकांची मागणी : इंग्रजीतून माहिती भरण्यासाठी घ्यावी लागते इतरांची मदत, मोजावे लागतात पैसे

योगेश पायघन

औरंगाबाद : जिल्ह्यातील फ्रंटलाइन वर्कर म्हणून सर्वात पुढच्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कर्मचारी म्हणून आशा आणि अंगणवाडी सेविकांकडे पाहिले जाते. त्यांच्या प्रत्यक्ष घर घर जाऊन संकलित केलेली माहिती, दिलेला पोषण आहार, लसीकरण आरोग्यदायी समाजाला मदत करते. मात्र, त्यांच्या सोयीसुविधांकडे, अडचणींकडे होणारे दुर्लक्ष सध्या चर्चेचा विषय बनला आहे. सातवी, आठवी पास अंगणवाडी सेविकांना माहिती भरण्यासाठी दिलेले पोषण ट्रॅकर ॲपवर सर्व माहिती इंग्रजीतून भरायची असल्याने जिल्हा परिषद सदस्यांसह अंगणवाडी सेविकांतूनही या ॲपमध्ये मराठीचा पर्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

---

जिल्ह्यातील अंगणवाड्या - ३४०७

एकूण अंगणवाडी सेविका - ३३००

------

पोषण ट्रॅकरवरील कामे

---

पोषण ट्रॅकरवर जिल्ह्यातील सुमारे ३ लाख लाभार्थ्यांच्या पोषणासंबंधीच्या नोंदी केल्या जातात. याशिवाय बालकांच्या वजन, उंची, लसीकरण, गृहभेटी, गावभेटी, कोरोना माता, किशोरवयीन मुली, निराधार मुलांची माहिती त्यात अपडेट करावी लागले. त्यात माहितीसाठी केवळ इंग्रजी भाषेचाच वापर होत असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांना माहिती भरण्यात अडचणी येत आहेत.

---

सर्वांना ॲपचे ऑफलाइन प्रशिक्षण मिळावे

---

ऑनलाइन प्रशिक्षणात त्याच मोबाइलमध्ये ॲप कसे चालवावे अनेक कार्यकर्तींना कळाले नाही. त्यामुळे ऑफलाइन प्रशिक्षण तालुकानिहाय होणे गरेजेचे आहे. बहुतांश सेविकांचे शिक्षण कमी आहे. त्यात इंग्रजीचे ज्ञान कमी त्यामुळे इंग्रजीसोबत मराठीचा पर्याय मिळावा. तरच अनेक प्रकारची माहिती बिनचूक भरता येईल.

- माया मस्के, अंगणवाडी सेविका, वैजापूर

---

पूर्वीच्या ॲपमध्ये मराठीचा पर्याय होता. त्यामुळे अडचण येत नव्हती. पोषण ट्रॅकर ॲपमध्ये बहुसंख्य वयस्कर अंगणवाडी कार्यकर्त्यांना इंग्रजीची अडचण येते. माहिती भरण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागते. वेळप्रसंगी पैसे देऊन माहिती भरून घ्यावी लागते. त्यामुळे मराठीचा पर्याय आला आणि सर्वांना ऑफलाइन प्रशिक्षण मिळाले तर अडचण येणार नाही.

- पल्लवी देशमुख, अंगणवाडी सेविका, करंजखेड

---

मोबाइलचीही अडचण

--

ग्रामीण भागात फिल्डवर काम करताना अंगणवाडी सेविकांचे मोबाइल नादुरुस्त झाले. ते दुरुस्त करून देण्याची शासनाची जबाबदारी आहे. मात्र, वर्ष-सहा महिने मोबाइलची दुरुस्ती करून मिळत नाही. त्यासाठी चार ते पाच हजार खर्च आठ हजार मानधनातून खर्च करणे अंगणवाडी सेविकेला शक्य नाही. त्यामुळे ऑफलाइन कामही ग्राह्य धरावे किंवा मोबाइल तत्काळ दुरुस्त करून मिळावा असे मस्के म्हणाल्या.

--

मराठी पर्याय देण्याची मागणी केली

पोषण ट्रॅकरवर आतापर्यंत ९२ टक्के डेटा भरला गेला आहे. अंगणवाडी सेविकांना ऑनलाइन प्रशिक्षणही दिले गेले आहे. मात्र, केवळ इंग्रजी भाषा असल्याने काही जुन्या अंगणवाडी सेविकांना अडचणी येतात. मात्र, त्या नातेवाइकांसह इतर सहकाऱ्यांच्या मदतीने माहिती भरतात. मराठीचे पर्याय देण्यासाठी मागणी करण्यात आली आहे.

- प्रसाद मिरकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि. प. औरंगाबाद

Web Title: Nutrition Tracker's Apple Hawa Marathi option

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.