तुंबळ हाणामारीत वृद्धाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2018 12:20 AM2018-08-09T00:20:40+5:302018-08-09T00:21:21+5:30

वैजापूर तालुक्यातील वाघला येथे पूर्ववैमनष्यातून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १२.३० वाजता घडली.

Old blood clot | तुंबळ हाणामारीत वृद्धाचा खून

तुंबळ हाणामारीत वृद्धाचा खून

googlenewsNext
ठळक मुद्देवैजापूर तालुक्यातील वाघला येथील घटना : सहा जण ताब्यात; पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
शिऊर : वैजापूर तालुक्यातील वाघला येथे पूर्ववैमनष्यातून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत गंभीर जखमी झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री १२.३० वाजता घडली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहे. याप्रकरणी शिऊर पोलीस ठाण्यात तब्बल १३ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी २ विधिसंघर्षग्रस्त बालकांसह सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून बुधवारी सायंकाळी पोलीस बंदोबस्तात मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


कारभारी बाळाजी पठारे (६५, रा. वाघला), असे मारहाणीत मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर जखमींमध्ये बाबासाहेब कारभारी पठारे (२५), लहानू कारभारी पठारे (३५), शिवाजी छगन पठारे (३८) अशी जखमींची नावे आहेत.
याप्रकरणी हेमंत गिरजाबा पठारे, भिकन गिरजाबा पठारे, मथुराबाई भिकन पठारे, समाधान भिकन पठारे, सखाहरी गिरजाबा पठारे, संघरत्न सखाहरी पठारे, मंगेश सखाहरी पठारे, सखाहरी पठारे आदी अनोळखी आरोपी, अशा एकूण १३ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी भिकन पठारे, हेमंत पठारे, सखाहरी पठारे, समाधान पठारे या चौघांसह दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिऊर पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वाघला येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी शिवाजी पठारे यांना आरोपींनी शिवीगाळ करून लाठ्या-काठ्यांनी, तसेच लोखंडी गजाने मारहाण केली. यावेळी आरोपींनी भांडण सोडविण्यासाठी आलेले कारभारी पठारे, बाबासाहेब पठारे, लहानू पठारे यांनाही मारहाण केल्याने ते जखमी झाले. वाघला येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
शिऊर पोलीस ठाण्याचे सपोनि. महेश आंधळे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मारहाणीतील जखमींना त्वरित १०८ रुग्णवाहिकेतून औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले; मात्र येथे उपचारादरम्यान कारभारी बाळाजी पठारे यांचा रात्री १२.२५ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी शिवाजी पठारे यांच्या फिर्यादीवरून १३ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी २ विधीसंघर्षग्रस्त बालकांसह ६ जणांना ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास सपोनि. महेश आंधळे करीत आहेत.
आरोपींच्या अटकेसाठी अंत्यसंस्कार रोखला
च्बुधवारी ४ वाजेच्या सुमारास मयत कारभारी पठारे यांचा मृतदेह वाघला येथे आणण्यात आला असता जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याचा पवित्रा कुटुंबियांनी घेतला.
च्यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार, सपोनि. महेश आंधळे यांनी सहकाºयांसह वाघला येथे धाव घेऊन मयताच्या कुटुंबियांची समजूत काढली. यानंतर सायंकाळी ५ वाजता मयतावर पोलीस बंदोबस्तात अंत्यंस्कार करण्यात आले.
अन् दोन्ही गट समोरासमोर आले
या घटनेविषयी शिऊर ठाणे प्रमुखांनी सांगितले की, एक ते दोन वर्षांपूर्वी पठारे कुटुंबामध्ये काही कारणावरून भांडण झाल्याने शिऊर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मंगळवारी (दि.७) वैजापूर न्यायालयात दोन्ही गट आमने-सामने आले होते. तेव्हा त्यांच्यात वाद झाला होता. सायंकाळी घरी जाताच आरोपींनी फिर्यादीसह इतरांवर हल्ला चढविला. त्यात कारभारी पठारे गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Old blood clot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.