औरंगाबाद : महानगरपालिकेच्या खात्यावर फक्त ८६ लाख जमा आहेत. मात्र, विविध बँकांमध्ये ४३९ कोटींच्या ठेवी आहेत. या ठेवी सरकारच्या विविध योजनांतून मिळलेल्या निधीच्या स्वरूपातील आहेत. जमा असलेल्या रकमांमध्ये बँकांमध्ये ठेकेदारांकडून काम सुरू करण्यापूर्वी २ टक्के अनामत रक्कम ठेवी म्हणून ८१ लाख ७८ हजार रुपये, करंट खात्यामध्ये ५ कोटी ८८ लाख ७८ हजार रुपये, एलबीटीचे ८१ लाख ५९ हजार रुपये, मुबलक सेवेचे २ कोटी ८२ लाख ७२ हजार रुपये, प्रोव्हिजन टॅक्स ५० लाख ६७ हजार रुपये, एलबीटी ३ लाख ४२ हजार रुपये, भाडे १५ लाख २२ हजार रुपये, पाणी कर ८१ हजार रुपये, विकास निधी ४९ लाख ५६ हजार रुपये, असा एकूण ७ कोटी ४० लाख रुपयांचा निधी जमा आहे. त्यातून ७ कोटी ३४ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले आहेत. सध्या बँकेमध्ये ८६ लाख रुपये जमा आहेत. दीड महिन्यात ८१ कोटी ४३ लाखांचे उत्पन्न पालिकेला विविध करवसुलीतून मिळाले होते.महापौर नंदकुमार घोडेले यांनी गुरुवारी लेखा विभागाची बैठक घेतली. विभागाने तिजोरीत असलेल्या रकमेची माहिती, कराची वसुली, बँकांमध्ये असलेल्या ठेवींची माहिती देण्यात आली. मनपाकडे ठेकेदारांची सुमारे २८० कोटींची थकबाकी असल्यामुळे ठेकेदार काम करण्यास तयार नाहीत. त्यामुळे अनेक कामे ठप्प पडली आहेत. आढावा बैठकीस उपायुक्त मंजूषा मुथा, मुख्य लेखाधिकारी सुरेश केंद्रे, संजय पवार, महावीर पाटणी, सहायक आयुक्त करणकुमार चव्हाण, विक्रम दराडे आदींची उपस्थिती होती.योजनेसाठी आलेले ४३९ कोटी बँकेतराष्ट्रीयीकृत बँकांमध्ये कर्ज निवारण निधी १०८ कोटी ६४ लाख रुपये, समांतर जलवाहिनी २७७ कोटी २२ लाख रुपये, घरकुल योजना २७ कोटी ५२ लाख रुपये, सातारा-देवळाईसाठी विकास निधी ९ कोटी ३० लाख रुपये, मूलभूत सुविधा अनुदान १० कोटी ६० लाख रुपये, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक ५ कोटी ७० लाख रुपये याप्रमाणे फिक्स डिपॉझिट म्हणून ४३९ कोटींच्या ठेवी आहेत. यामध्ये व्याजाच्या रकमेचाही समावेश आहे.
महापालिकेच्या खात्यावर फक्त ८६ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 11:45 PM
महानगरपालिकेच्या खात्यावर फक्त ८६ लाख जमा आहेत. मात्र, विविध बँकांमध्ये ४३९ कोटींच्या ठेवी आहेत. या ठेवी सरकारच्या विविध योजनांतून मिळलेल्या निधीच्या स्वरूपातील आहेत.
ठळक मुद्देठेकेदाराचे २८० कोटी देणे : तिजोरीत खडखडाट, बिले देणे अवघड