विकासगंगेतून झालेल्या १२ कामांची आज उद्घाटने

By Admin | Published: July 11, 2014 12:54 AM2014-07-11T00:54:16+5:302014-07-11T01:04:47+5:30

औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा स्वेच्छा निधी व खा. विजय दर्डा यांच्या निधीतून घेण्यात आलेल्या विविध विकासकामांची उद्घाटने शुक्रवारी (दि. १०) करण्यात येणार आहे.

Opening of 12 works of development ganga today | विकासगंगेतून झालेल्या १२ कामांची आज उद्घाटने

विकासगंगेतून झालेल्या १२ कामांची आज उद्घाटने

googlenewsNext

औरंगाबाद : शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचा स्वेच्छा निधी व खा. विजय दर्डा यांच्या निधीतून घेण्यात आलेल्या विविध विकासकामांची उद्घाटने शुक्रवारी (दि. १०) करण्यात येणार असून, या कामांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. कार्यकर्ते, नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
सकाळच्या सत्रातील उद्घाटने
वेळ सकाळी ९ वाजता ( वॉर्ड क्र. ७० विद्यानगर) न्यू विशालनगर येथील हनुमान मंदिर गल्लीतील आमदार निधीतून करण्यात आलेला सिमेंट रस्ता.
सकाळी १० वाजता : (वॉर्ड क्र. ७० विद्यानगर) न्यू विशालनगरातील चिंचेच्या झाडाच्या गल्लीतील आमदार निधीतून करण्यात आलेला सिमेंट रस्ता.
सकाळी १०.३० वाजता (वॉर्ड क्र. ७१ न्यायनगर) न्यायनगर ते हुसेन कॉलनी रस्त्याचे खासदार निधीतून करण्यात आलेले खडीकरण व रस्त्याचे डांबरीकरण.
सकाळी ११.१५ वाजता (वॉर्ड क्र.४९ गुलमोहर कॉलनी) एन-५ मध्ये पाशुवाडी सह्याद्रीनगर येथील दर्ग्याजवळ आमदार निधीतून उभारण्यात आलेला खुला सभामंडप व सिमेंट रस्ता.
दुपारी ११.४५ वाजता (वॉर्ड क्र.४८ आविष्कार कॉलनी) चिश्तिया कॉलनीत टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन.
दुपारी १२ वाजता (वॉर्ड क्र. ४८ आविष्कार कॉलनी) सफा वॉशिंग सेंटरपासून गल्लीतील सिमेंट रस्ता.
सायंकाळची उद्घाटने
सायं. ४ वाजता - (वॉर्ड क्र. ८२ भारतनगर) भारतनगरात आमदार निधीतून टाकण्यात आलेली ड्रेनेज लाईन.
सायं. ५ वाजता- (वॉर्ड क्र. ८३ पुंडलिकनगर) गल्ली नं. ५ मधील चव्हाण यांचे निवासस्थान ते जनता मेडिकलपर्यंतचा सिमेंट रस्ता.
सायं. ५ वाजता-(वॉर्ड क्र. ८३ पुंडलिकनगर) गल्ली नं. ५ मधील श्रीनाथ ज्वेलर्स ते नाल्यापर्यंतचा सिमेंट रस्ता.
सायं.५.३० वाजता -(वॉर्ड क्र. ८३ पुंडलिकनगर) गल्ली नं. ३ मधील कल्याण कावरे यांच्या निवासस्थानापासून ते मुख्य रस्त्यापर्यंतचा सिमेंट रस्ता.
सायं. ५.३० वाजता - (वॉर्ड क्र. ८३ पुंडलिकनगर) गल्ली नं. ३ मधील नाल्यापासून गजानननगर मुख्य रस्त्यापर्यंत सिमेंट रस्ता.

Web Title: Opening of 12 works of development ganga today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.