औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चा ही एक सामाजिक चळवळ असून त्याचा राजकीय पक्षासाठी वापर करण्यास समन्वयकांनी विरोध केला आहे. क्रांती मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा समाज सहभागी आहे. काही लोकांनी राजकीय स्वार्थासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले. ज्यांना निवडणूक लढवायची त्यांनी लढवावी. मात्र राजकीय पक्ष काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या नाव वापरण्यास आमचा विरोध असल्याचे समन्वयक सुरेश वाकडे , किशोर चव्हाण, डॉ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मराठा क्रांती मोर्चाच्या राजकीय वापरास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 3:09 AM