केज : अनधिकृतपणे रस्ता अडवून बसची तोडफोडकेल्याप्रकरणी दोषी ठरवत १२ जणांना सामाजिक सेवा म्हणून येथील बसस्थानक, केज व युसूफवडगाव पोलीस ठाणे, येथील जिल्हा परिषद शाळा व न्यायालयाचे प्रांगण साफ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शनिवारी दिले.२५ आॅगस्ट २०१३ रोजी सोमनाथ वैरागे, विशाल वैरागे, रामदास वैरागे, आश्रुबा वैरागे, प्रवीण वैरागे, नामदेव वैरागे, गणेश वैरागे, संजय जाधव, महादेव वैरागे, पिंटू वैरागे, विजय गायकवाड आणि शरद वैरागे यांनी अण्णा भाऊ साठे यांचे बॅनर फाडणाऱ्यांविरुद्ध कारवाईची मागणी केली होती. या मागणीसाठी त्यांनी युसूफवडगाव बसस्थानकासमोरील रस्ता अनधिकृतपणे अडविला. तसेच येणारी-जाणारी वाहने अडवून परभणी - तुळजापूर या बसवर दगडफेक केली. यात बसच्या समोरची काच फोडून दहा हजार रूपयांचे नुकसान केले. याप्रकरणी युसूफवडगाव ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सपोनि एस. एच. शेख यांनी तपास करून न्यायालयासमोर दोषारोपपत्र सादर केले. सरकारी पक्षाच्या वतीने एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले.आरोपींनी दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा पुरावा ग्राह्यधरीत १२ आरोपींना भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये दोषी ठरवत केजचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राहुल शिंदे यांनी आरोपींना सामाजिक सेवा म्हणून केज बसस्थानक, केज व युसूफवडगाव पोलीस ठाणे, जिल्हा परिषद शाळा केज व केज न्यायालयाचे प्रांगण साफ करण्याचे आदेश दिले.सरकारी पक्षाच्या वतीने डी. आर. घुले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
बस तोडफोडप्रकरणी प्रांगण सफाईचे आदेश
By admin | Published: December 20, 2015 11:27 PM