औरंगाबाद : जन्मदात्रीचा सांभाळ न करता तिला घराबाहेर हकलून देणाऱ्या तीन मुलांसह सुनेविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना ३ मे रोजी सकाळी हडकोतील स्वामी विवेकानंदनगरात घडली.संदीप एकनाथ कोतकर, सचिन एकनाथ कोतकर, सुनील एकनाथ कोतकर आणि सुनेचा आरोपींमध्ये समावेश आहे. पोलिसांनी सांगितले की, स्वामी विवेकानंदनगरात ६० वर्षीय महिला तिची तीन मुले आणि सुनांसह राहते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आई आणि मुले, सून यांच्यात सतत वाद होत आहे. त्यामुळे तिन्ही मुले आणि सुनांंनी वृद्धेचा सांभाळ करण्यास नकार देत आईला जेवण देणे बंद केले. शुक्रवारी सकाळी त्यांनी जन्मदात्रीला घराबाहेर हकलून दिले. या घटनेनंतर दुसºया दिवशी वृद्धेने सिडको पोलीस ठाणे गाठून मुले आणि सून यांच्याविरोधात तक्रार नोंदविली. पोलीस हेड कॉन्स्टेबल सिरसाट तपास करीत आहेत.
जन्मदात्रीचा सांभाळ न करता घराबाहेर काढले; तीन मुलांसह सुनेविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 11:31 PM
जन्मदात्रीचा सांभाळ न करता तिला घराबाहेर हकलून देणाऱ्या तीन मुलांसह सुनेविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदविला. ही घटना ३ मे रोजी सकाळी हडकोतील स्वामी विवेकानंदनगरात घडली.
ठळक मुद्देसिडको पोलिसांकडून तपास : मुले करतात खाजगी नोकरी