कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती पालोदकरांविरोधातील अविश्वास ठराव पारित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 07:22 PM2019-06-14T19:22:11+5:302019-06-14T19:24:47+5:30

14 विरुद्ध 0 मतानी हा अविश्वास पारित

Passed an unbelief resolution against agricultural income market chairperson Palodkar | कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती पालोदकरांविरोधातील अविश्वास ठराव पारित

कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती पालोदकरांविरोधातील अविश्वास ठराव पारित

googlenewsNext

सिल्लोड (औरंगाबाद ) : सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 14 संचालकांनी गुरुवारी सभापती रामदास पालोदकर यांच्या विरुद्ध दाखल केलेल्या अविश्वासाच्या बाजूने मतदान केले.14 विरुद्ध 0 मतानी हा अविश्वास पारित झाल्याची घोषणा उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी शुक्रवारी दुपारी 4 वाजता केली. यामुळे सिल्लोड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सिल्लोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रामदास पालोदकर यांच्या कार्यपध्दतीच्या विरोधात उपसभापती नंदकिशोर सहारे व जि.प उपाध्यक्ष तथा संचालक केशवराव पाटील तायडे यांच्यासह १४ संचालकांनी (दि.०६) गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहून अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी याच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली. यावेळी पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी काम पाहिले.त्यांना सहायक निबंधक न्यानेश्वर मातेरे , तहसीलदार रामेश्वर गोरे, बाजार समिती सचिव विश्वास पाटिल यांनी मदत केली.
 

Web Title: Passed an unbelief resolution against agricultural income market chairperson Palodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.