औरंगाबाद : शहरात व्यापाऱ्याला टार्गेट करून लुटमारीच्या घटना वाढल्याने व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे. लुटमारीच्या घटना ताज्या असतानाच बुधवारी रात्री एका पिग्मी एजंटला रस्त्यात अडवून चाकूहल्ला करीत ५० हजाराला लुटल्याची घटना घडली.व्यापाºयांनी दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांना भेटून सुरक्षा व्यवस्थेविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यावेळी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी व्यापाºयांना सुरक्षेची हमी दिलेली असतानाच बुधवारी रात्री पुन्हा जिन्सी ठाण्याच्या हद्दीत दिलीप शांतीलाल पांडे (५५) यांना विनानंबरच्या मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी रस्त्यात अडवून हल्ला चढविला. बॅग हिसकावत असताना पांडे बॅग सोडत नसल्याने एकाने त्यांच्या हातावर चाकूचा वार केला. त्यामुळे पांडे यांनी बॅग सोडताच हल्लेखोर बॅग घेऊन दुचाकीवरून सुसाट वेगाने निघून गेले. या प्रकारामुळे पुन्हा व्यापारी वर्गात दहशतीचे वातावरण पसरले आहे.पाळत ठेवून घडला प्रकारदिलीप पांडे हे वर्धमान बँकेत पिग्मी एजंट असून, ते नेहमीप्रमाणे पिग्मी जमा करीत (एमएच २० सीएफ ३९३१) या दुचाकीवर निघाले होते. रद्दीवाल्याकडून त्यांंनी रात्री ८ वाजेच्या दरम्यान कलेक्शन केले आणि ते तक्षशिलानगरकडे जाणाºया रस्त्याने निघाले असता बॅटकोलगत तोंडाला बांधून एका मोटारसायकलवरून आलेल्या तिघानी पांडे यांना रस्त्यात अडवून अचानक मारहाण सुरू केली.तिघेही हिंदी बोलत होतेलुटमार करणारे तरुण होते आणि तिघेही हिंदी भाषेतून बोलत होते. ‘अरे मला का मारता’, असे पांडे यांनी विचारले असता,‘तू बॅग दे’ असे म्हणत त्यांना मारहाण सुरूच ठेवली होती. ते बॅग सोडत नसल्याने त्यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. ५० हजारांची रोकड, कागदपत्रे व मशीन घेऊन चोरटे पसार झाले.माहिती मिळताच जिन्सीचे पोलीस निरीक्षक श्यामसुंदर वसूरकर व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तो पर्यंत नागरिकांनी पांडे यांना जवळील एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले होते.आरोपींनी पांडे यांच्यावर पाळत ठेवून हा हल्ला केला असावा, असा अंदाज पोलीस निरीक्षक वसूरकर यांनी व्यक्त केला आहे.सीसीटीव्ही फुटेज तपासणीपांडे ज्या ठिकाणी कलेक्शन करतात त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करणार आहोत. पंधरा मिनिटांत आला फोनरद्दी डेपोचालक म्हणाले की, आमच्या दुकानावरून कलेक्शन करून गेलेल्या पांडे यांचा १५ मिनिटांनी मला फोन आला, ‘शेठ मला मारहाण करून अप्पाच्या हॉटेलजवळ लुटले. तुम्ही बाहेर या,’ असे ते म्हणाले. त्यावरून आम्ही पळत गेलो. त्यावेळी दुचाकी रस्त्यावर पडलेली आणि तिचा हेड लॅम्प फुटलेला दिसला. पांडे यांच्या हाताला मार लागलेला असल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी दवाखान्यात घेऊन गेल्याचे सांगण्यात आले.जिन्सी पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकानेदेखील परिसरात भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील व्यापारी व नागरिकांनी केली आहे.फुटेज करणार व्हायरलजिन्सी ठाण्याच्या हद्दीत एकामागोमाग एक घटना घडत असून, सीसीटीव्हीत कैद झालेल्या घटनांचे फुटेज औरंगाबाद शहरासह लगतच्या इतर जिल्ह्यांत व्हायरल करणार आहे. बसस्टॅण्ड, रेल्वेस्टेशन, तसेच इतर रहदारीच्या ठिकाणांवर छायाचित्र चिकटविणार आहोत, असे पोलीस निरीक्षक वसूरकर यांनी सांगितले.
पिग्मी एजंटला अडवून चाकूहल्ला करीत ५० हजार लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 12:19 AM
औरंगाबाद : शहरात व्यापाऱ्याला टार्गेट करून लुटमारीच्या घटना वाढल्याने व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे. लुटमारीच्या घटना ताज्या असतानाच ...
ठळक मुद्देबुधवारी रात्री ८.१५ वाजेचा थरार: बॅटकोजवळ रद्दीडेपोसमोर अडवून केला हल्ला