लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : औरंगाबाद युटिलिटी कंपनीने खरेदी केलेले १२ कोटी रुपयांचे पाइप गायब झाले असून, महापालिका प्रशासनाने गायब झालेल्या पाइपच्या व्यासाप्रमाणे अनेक वॉर्डांमध्ये जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा काढल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. या प्रकरणात अनेक नगरसेवकही पाइप गेले कुठे, असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. ११४ नगरसेवकांना पाइप वाटप केल्याचे पुरावे मनपा प्रशासनाकडून सादर करण्यात येत आहेत.मागील वर्षी औरंगाबाद युटिलिटी कंपनीने तब्बल ३० कोटी रुपयांचे पाइप खरेदी केले होते. त्यातील ५ किलोमीटरचे पाइप जायकवाडी येथे टाकण्यात आले. १ आॅक्टोबरला कंपनीची हकालपट्टी झाल्याने समांतरचे काम अर्धवट पडले आहे. त्यापूर्वी कंपनीने शहरातील विविध वसाहतींमध्ये नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी पाइपची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. १००, १५० आणि २०० मि. मी. व्यासाच्या जलवाहिन्या अनेक नगरसेवकांनी आपल्या वॉर्डांत आणून ठेवल्या होत्या. त्याचा वापर कुठेच करण्यात आला नव्हता. अवघ्या एक वर्षातच या जलवाहिन्या गायब झाल्याचा खळबळजनक प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. तब्बल १२ कोटी रुपयांचे पाइप गायब झाले आहेत. नगरसेवकांनी आणून ठेवलेले पाइप गायब झाले असतानाच महापालिका प्रशासनाने काही ठरावीक नगरसेवकांच्या वॉर्डात नवीन जलवाहिन्या टाकण्यासाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मजेशीर बाब म्हणजे या (पान २ वर)नगरसेवक राजू शिंदे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे. कोट्यवधी रुपयांचे पाइप कसे काय गायब होऊ शकतात. कंपनीने पाइप वाटप केले. कंपनी निघून गेल्यावर महापालिकेने हे पाइप आपल्या ताब्यात का घेतले नाहीत. सर्वसाधारण सभेत यावर सखोल चौकशीची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
पाइप गायब; नगरसेवकही अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2017 12:01 AM