औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव शांततेत पार पडावा म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस उपायुक्तांसह, ३५ पोलीस निरीक्षक, १०५ उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक, १६७९ पोलीस कर्मचारी, २२१ महिला कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.होमगार्ड, राखीव पोलीस दलाची कंपनीदेखील रस्त्यावर तैनात करण्यात आली आहे. खबरदारी म्हणून पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. लाठ्या, ढालीसह सशस्त्र पोलिसांचा कडक पाहारा मिरवणुकीत होता.सैराट दुचाकीस्वार टार्गेटदुचाकीच्या सायलन्सरमधून फटाक ा वाजविणे, सुसाट मोटारसायकली चालवून रहदारीत अडथळा निर्माण करणाºयांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. मोटारसायकलीवर तीन जण बसवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारेदेखील यातून सुटणार नाहीत. शिवजयंती कार्यक्रमाचा आनंद नागरिकांना घेता यावा; परंतु रहदारीत गैरसोयीमुळे कोंडी होणार नाही, याची दक्षता घेण्यात आली.क्रांतीचौक, सिडको, हडको, गारखेडा, मुकुंदवाडी, शिवाजीनगर इत्यादी भागांत पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. स्थानिक पोलीसदेखील लक्ष ठेवून होते.
शिवजयंती शांततेत पार पडावी म्हणून पोलिसांची करडी नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:29 PM
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव शांततेत पार पडावा म्हणून पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस उपायुक्तांसह, ३५ पोलीस निरीक्षक, १०५ उपनिरीक्षक व सहायक निरीक्षक, १६७९ पोलीस कर्मचारी, २२१ महिला कर्मचाºयांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
ठळक मुद्देपोलीस उपायुक्त : ३५ पोलीस निरीक्षक, १०५ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, १६७९ पोलीस कर्मचारी, २२१ महिला कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त