वाळूज महानगर: लोकसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. वाळूज व एमआयडीसी वाळूज या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १५७ केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान होत आहे. वाळूजमहानगर परिसरात पोलीस व निवडणूक आयोगाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. परिसरातील मतदान केंद्रांची पोलीस व निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी करुन सुविधा व सुरक्षेचा आढावा घेतला. एखाद्या केंद्रावर ‘इव्हीएम’मध्ये तांत्रिक बिघाट झाल्यास तात्काळ दुसरे मशिन उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत येणाºया गावांत १०७ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. वाळूज पोलीस ठाणे हद्दीत येणाºया गावांत ५० केंद्र असून, तेथे मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, एमआयडीसी हद्दीत १ पोलीस निरीक्षक, १ सहायक निरीक्षक, ६ उपनिरीक्षक , ८४ पोलीस, होमगार्ड तर वाळूज हद्दीत १ पोलीस निरीक्षक, ४ उपनिरीक्षक आदींसह १०० पोलिस व होमगार्डस बंदोबस्तावर असतील.