नगिना पिंपळगाव परिसरात दुपारी व रात्रीच्या वेळी वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. याविषयी वारंवार तक्रारी करण्यात येतात; मात्र महावितरणकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात उकाडा सुरू झाला आहे. उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना आता विजेच्या लपंडावाचा सर्वाधिक त्रास होऊ लागला आहे. फॅॅन, कुलर सुरू करताच वीज खंडित होते. तर दहा ते पंधरा मिनिटे येतच नाही. दीर्घ प्रतीक्षेनंतर वीजपुरवठा सुरळीत जरी झाला तरी पुन्हा वीज खंडित होते. या लपंडावाचा परिणाम विद्युत उपकरणावर देखील होऊ लागला आहे.
तासनतास वीजपुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. ते उपलब्ध राहत नाहीत. फोन बंद करून ठेवतात. लाईनमन यांनी फोन घेतला तर प्रश्न सोडविण्या ऐवजी नागरिकांशी उद्धटपणे उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.
- सोन्याबापू सावंत, नागरिक.