औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणार आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी माहिती विमानतळ प्राधिक रणातर्फे देण्यात आली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेऊन डी. जी. साळवे यांनी औरंगाबादहून नवीन विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. विमान कंपन्यांना येथून विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात प्रोत्साहन देण्याची मागणी केली. याबरोबरच इमिग्रेशन, आंतरराष्ट्रीय चेक पोस्टच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर औरंगाबादच्या अपुऱ्या विमानसेवेसंदर्भात चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विमानसेवा वाढविण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली. याबरोबर औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा करण्यात येत असल्याचे सांगितले.नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एअर विस्ताराकडून औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर उडान योजनेंतर्गत उदयपूर, जोधपूरसाठीही विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यापुढे आता आंतरराष्ट्रीय विमानसेवेसंदर्भात चर्चा सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे नव्या वर्षात औरंगाबादहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा विस्तार होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.विमानतळावरून आजघडीला केवळ एअर इंडिया, जेट एअरवेज आणि ट्रू जेट कंपनीची विमानसेवा सुरू आहे. या तीन कंपन्यांच्या सेवेमुळे औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि तिरुपतीशी हवाईसेवेने जोडलेले आहे. गेल्या दीड वर्षापासून विमानसेवा वाढविण्याचा विमानतळ प्राधिकरणाकडून प्रयत्न सुरू आहे.
औरंगाबादहून बँकॉक आणि टोकियो विमानसेवेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 11:56 PM
: चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणार आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हवाई कनेक्टिव्हिटीची परिस्थिती मांडली. तेव्हा औरंगाबाद शहर बँकॉक आणि टोकियोशी जोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली, अशी माहिती विमानतळ प्राधिक रणातर्फे देण्यात आली.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांशी चर्चा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबरही विमानसेवा वाढविण्यासंदर्भात संवाद