लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शासनाने ५५ रुपयांनी खरेदी केलेली तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानावर अवघ्या ३५ रुपये किलोने मिळत आहे. याचा परिणाम खुल्या बाजारपेठेतील डाळींच्या किमतीवर झाला आहे. उडीद, हरभरा, मूग, मसूर डाळींचे भाव क्ंिवटलमागे ३०० ते ८०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. या मंदीस मठ डाळ मात्र अपवाद ठरली आहे.अडत बाजारात तुरीचे भाव घसरले असताना शासनाने ५५०० रुपये क्ंिवटल हमीभाव देऊन शेतकऱ्यांकडून तूर खरेदी केली. या शासकीय तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानातून ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्याचा निर्णय शासनाने घेतला. चालू महिन्याच्या मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने डाळींचे भाव वधारण्यास सुरुवात झाली होती. पण स्वस्त धान्य दुकानात ५०० क्ंिवटल तूर डाळ विक्रीला येताच खुल्या बाजारातील तूर डाळीच्या भावात क्ंिवटलमागे ४०० ते ५०० रुपयांनी घट झाली असून, सध्याचा भाव ५१०० ते ५५०० रुपये आहे. विदेशातूनही तुरीची आवक होत असल्याने त्याचाही परिणाम दिसून आला. चालू महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने हजेरी लावल्याने अन्य डाळींचे भावही कमी झाले.तब्बल ८०० रुपयांनी गडगडून ३८०० ते ४२०० रुपये प्रतिक्विंटलवर येऊन ठेपली आहे. ५०० रुपयांनी घसरून हरभरा डाळ ३९०० ते ४२०० रुपये, मूग डाळ ४०० रुपयांनी कमी होऊन ५८०० ते ६२०० रुपये तर मसूर डाळ ३०० रुपयांनी स्वस्त होऊन ३९०० ते ४२०० रुपये प्रतिक्ंिवटलने विक्री होत आहे. मात्र, या मंदीत मठ डाळीने आपला भाव वाढवून घेतला आहे. यासंदर्भात डाळीचे विक्रेते नीलेश सोमाणी यांनी सांगितले की, शालेय आहारात मठ डाळीचा वापर होत असतो. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर ४०० रुपयांनी वधारून मठ डाळ सध्या ५२०० ते ५५०० रुपये प्रतिक्ंिवटल विकल्या जात आहे.मागील पाच महिन्यांत डाळींच्या भावात मोठी घसरणमागील पाच महिन्यांत डाळींच्या भावात मोठी घसरण पाहण्यास मिळाली. यात क्ंिवटलमागे भाव २३०० ते २६०० रुपये गडगडल्याने सर्वाधिक मंदी उडीद डाळीत नोंदविण्यात आली. त्यानंतर मूग डाळ १७०० ते १८०० रुपये, हरभरा डाळ १२०० ते १३०० रुपये, तूर डाळ ९०० ते १००० रुपये, तर मसूर डाळीचे भाव ८०० रुपये प्रतिक्ंिवटलमागे कमी झाले आहेत. आताचे भाव लक्षात घेता यंदा मार्च, एप्रिलमध्ये वार्षिक धान्य खरेदी करणाºयांना यंदा डाळी महाग पडल्या.
‘त्या’ तुरीने उतरले डाळींचे भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 12:15 AM
शासनाने ५५ रुपयांनी खरेदी केलेली तुरीची डाळ स्वस्त धान्य दुकानावर अवघ्या ३५ रुपये किलोने मिळत आहे. याचा परिणाम खुल्या बाजारपेठेतील डाळींच्या किमतीवर झाला आहे. उडीद, हरभरा, मूग, मसूर डाळींचे भाव क्ंिवटलमागे ३०० ते ८०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. या मंदीस मठ डाळ मात्र अपवाद ठरली आहे.
ठळक मुद्देऔरंगाबाद धान्य बाजारपेठ : क्ंिवटलमागे ३०० ते ८०० रुपयांपर्यंत घट; मठ डाळ मात्र वधारली