सामाजिक सलोखा राखण्याला प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 01:26 AM2018-07-19T01:26:16+5:302018-07-19T01:26:26+5:30

दंगलीच्या पार्श्वभूमीवर आपण दीड महिन्यापूर्वी आयुक्तपदी रुजू झालो. दंगलीमुळे वेगवेगळ्या समाजात जातीय तेढ निर्माण झाले होते. ही बाब लक्षात घेऊन आपण जातीय सलोखा वाढविण्यास प्राधान्य दिले. त्यानुसार विविध वसाहती आणि कॉलन्यांमध्ये सामाजिक एकोप्याचे वातावरण तयार करण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.

Priority to maintain social reconciliation | सामाजिक सलोखा राखण्याला प्राधान्य

सामाजिक सलोखा राखण्याला प्राधान्य

googlenewsNext

औरंगाबाद : दंगलीच्या पार्श्वभूमीवर आपण दीड महिन्यापूर्वी आयुक्तपदी रुजू झालो. दंगलीमुळे वेगवेगळ्या समाजात जातीय तेढ निर्माण झाले होते. ही बाब लक्षात घेऊन आपण जातीय सलोखा वाढविण्यास प्राधान्य दिले. त्यानुसार विविध वसाहती आणि कॉलन्यांमध्ये सामाजिक एकोप्याचे वातावरण तयार करण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिली.
औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बुधवारी (दि.१८) लोकमत भवनला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी संपादकीय सहकाऱ्यांसोबत मनमोकळा संवाद साधला. प्रारंभी लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आयुक्त म्हणाले की, दंगलीच्या पार्श्वभूमीवर आपण शहरात रुजू झालो. यामुळे जातीय सलोखा वाढविण्यास आपण प्रथम प्राधान्य दिले. परिणामी विविध जाती-धर्माच्या लोकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण होत आहे. कम्युनिटी पोलिसिंगसाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या सदस्यांमध्ये मनपा आयुक्त, सिडकोचे मुख्याधिकारी आणि अन्य विभागाच्या अधिकाºयांचा समावेश आहे. सामाजिक सलोखा बैठकीला या अधिका-यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतात. परिणामी तरुणांना आता पोलिसांच्या बाजूने आणण्यात आम्ही यशस्वी ठरत आहोत.
कच-याचा प्रश्न
सोडविण्यासाठी प्रयत्नशील
दोन महिन्यांपूर्वी मिटमिटा येथे कच-यामुळे शहरात दंगल झाली. कच-याचा ज्वलंत प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. कच-यामुळे पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महानगरपालिका आयुक्त आणि पदाधिका-यांसोबत सतत चर्चा असते. यासोबत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कोणतीही घटना घडत असेल तर तेथे आम्ही हस्तक्षेप करून तो प्रश्न तातडीने मार्गी लागावा, यासाठी आवश्यक तेथे हस्तक्षेप करीत असतो.
राहुल श्रीरामे यांना
पाठीशी घातले नाही
पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्याविषयी विचारले असता पोलीस आयुक्त म्हणाले की, हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. याची कुणकुण आमच्या कानावर आली तेव्हा लगेच आम्ही उपायुक्त श्रीरामे यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. त्यानंतर आयुक्तालयाच्या व्हॉटस्अ‍ॅपवर पीडितेची तक्रार प्राप्त झाली. तेव्हापासून कायदेशीर प्रक्रियेला सुरुवात झाली. महिला अधिका-यांनी तिला बोलावून तक्रारीची पडताळणी केली आणि लगेच प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविला. पुराव्यासह जबाब नोंदविण्यासाठी येते असे सांगून गेलेली पीडिता अद्यापही तपास अधिकाºयांसमोर येत नाही. ती समोर येत नसल्याने प्रकरण चिघळत असून, पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत आहे.
जालना रोड, बीड बायपासच्या रुंदीकरणासाठी बैठका
बीड बायपासला सर्व्हिस रस्ता आणि जालना रस्त्याला समांतर रस्ता आवश्यक आहे. या दोन्ही रस्त्यांचे तातडीने रुंदीकरण व्हावे, यासाठी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळ आणि मनपा अधिका-यांची बैठक घेतली. विशेषत: बीड बायपास रस्त्यावरील सततच्या अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथील जड वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त सुरू करण्यात आला. जालना रस्त्याला समांतर मार्ग म्हणून ओळखल्या जाणाºया लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्यावरील रखडलेल्या पुलांचे काम तातडीने पूर्ण करावे, असे मनपाला सांगितल्याचे पोलीस आयुक्तांनी नमूद केले.
स्ट्रीट क्राईम रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई
गणेशोत्सव जवळ आला आहे. रस्त्यांवर घडणाºया गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक ठाणेदारांना रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत.

Web Title: Priority to maintain social reconciliation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.