अभियानापेक्षा शेतकºयांचे सोयाबीनला प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:38 AM2017-10-04T00:38:06+5:302017-10-04T00:38:06+5:30
मागील दोन वर्षांपासून ग्रामस्तरावर विविध अभियानांचा मारा आहे. एक संपते न संपते तोच दुसरे सुरु होते. तेही लोकसहभागाचीच. त्यामुळे ग्रामस्थांना यात काही रसर् ंराहिला नाही.
संतोष भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मागील दोन वर्षांपासून ग्रामस्तरावर विविध अभियानांचा मारा आहे. एक संपते न संपते तोच दुसरे सुरु होते. तेही लोकसहभागाचीच. त्यामुळे ग्रामस्थांना यात काही रसर् ंराहिला नाही. आता १ ते १५ आॅक्टोबर पर्यंत ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामात ‘ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवड्यासाठी’ अधिकारी कर्मचारी गावात जात आहेत. मात्र सगळेच सोयाबीन काढणीस जात असल्याने गावात कुणीच भेटत नसल्याने तसेच परतण्याची वेळ आली आहे.
यापूर्वी ‘ग्राम उदय से भारत उदय’ अभियानात प्रत्येक गावाच्या विकासाचे आराखडे बनविण्यात आले आहेत. त्यातून सध्यातरी काही निष्पन्न झाले नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. त्यानंतर हागणदारीमुक्तीचा नारा आला. त्यात काम सुरू होते न होते तोच ‘स्वच्छता हिच सेवा’ अभियान राबविण्यात आले. शेतीत काम नसल्याने लोकांनी त्यालाही चांगला प्रतिसाद दिला. ‘मिशन अंत्योदय’ यातून प्रत्येक गावातील गरिबी करण्यात येईल, असे सांगितले जाते. तसेच स्वच्छ भारत मिशनअंतर्गत शौचालयाचेही बांधकाम युद्धपातळीवर सुरु आहेत. कोणतेही अभियान आले की, दुष्काळाच्या काळात खिशालाच चाट लावून जात असल्यामुळे गावात अधिकाºयांची गाडी आली की, ग्रामस्थ थेट त्यांना कट मारत आहेत. आता १ ते १५ आॅक्टोबरदरम्यान ‘ग्रामसमृद्धी व स्वच्छता पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. अधिकारी व कर्मचाºयांना चक्क ग्रामस्थांचा शोध घ्यावा लागत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. या अभियानात पंधरा दिवसात कारावयाचे नियोजन तंतोतंत पद्धतीने केलेले आहे.
मात्र अभियानात सोयाबीन काढणीमुळे ग्रामस्थच भेटत नसल्याने कर्मचारी ग्रामस्थांना विनवणी करण्यातच हैराण आहेत. यामध्ये १ आॅक्टोबर रोजी गावात पंधरवडाविषयक जाणीव जागृती, तर २ आॅक्टोबर रोजी प्रभातफेरी व ग्रामसभा, मिशन अंत्योदयअंतर्गत निवडलेल्या ग्रामपंचायतींच्या योजनेबाबत सविस्तर माहिती देणे, तसेच ३ ते ५ आॅक्टोबरदरम्यान, गावात स्वच्छता व आरोग्यविषयक जाणीव जागृती करणे, ६ ते ९ आॅक्टोबरमध्ये कृषी सभा घेऊन कृषीच्या मदतीने शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे. तर १० आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत विकास आराखड्यात गावास माहिती देणे, ११ आॅक्टोबर रोजी मनरेगा, स्वच्छता, घनकचरा सांडपाणी व जलसंधारण बाबत कृती आराखडा, १२ आॅक्टोबर रोजी पीएमईजी लाभार्थ्यांची यादी वाचून दाखविणे व घरकुलांच्या कामासाठी सुरुवात, तर १३ व १४ आॅक्टोबर रोजी कौशल्य विकासाबाबत विविध योजनांची युवकांना माहिती देणे आणि शेवटी १५ आॅक्टोबर रोजी पंधरवड्यात केलेल्या कामाची व नियोजनाची माहिती गावकºयांना देणे व शासनास अहवाल देणे असे अतिशय सूक्ष्म नियोजन केले खरे; मात्र हा संपूर्ण कार्यक्रमच सोयाबीन कालावधीत असल्याने फार भयंकर परिस्थिती आहे. विशेष म्हणजे हे अभियान लोकसहभागातून असल्याने यासाठी लोकांचा सहभाग महवाचा असतो. मात्र सोयाबीन काढणीमुळे ते शक्य होत नसल्याचे समोर येत आहे. तसेच समारोपाचा फोटो कसा घ्या, हेही नियोजन केलेले आहे.