जिल्ह्यात सर्वेक्षणानंतर ६४ बोअर प्रस्तावित
By Admin | Published: February 18, 2016 11:27 PM2016-02-18T23:27:28+5:302016-02-18T23:42:56+5:30
हिंगोली : सर्वेक्षणानंतर ६४ बोअर तर १३ तात्पुरत्या पूरक योजनांची कामे करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
हिंगोली : जिल्ह्यात पाणीटंचाईवरील उपाययोजना करण्यासाठी भूजल सर्वेक्षण व जि.प.च्या भूवैज्ञानिकांकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ६४ बोअर तर १३ तात्पुरत्या पूरक योजनांची कामे करण्याची शिफारस करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात टंचाई निवारणाचे काम गतिहीन असल्याच्या तक्रारी होत आहेत. वारंवार मागणी करूनही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षणच्या पाहणीनंतर खरोखर उपायांची गरज असलेल्या ठिकाणांना आता न्याय मिळेल काय, याची प्रतीक्षा आहे. यामध्ये ३00 गावांनी टंचाईत ३४१ बोअरचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यापैकी ६४ करण्यायोग्य आहेत. यात हिंगोली-१२, औंढा-१४, सेनगाव-१९, वसमत-११, कळमनुरी-८ अशी तालुकानिहाय संख्या आहे. तर १४२ अयोग्य असल्याचे मत नोंदविले आहे. त्याचबरोबर टंचाईत ७८ नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्तीचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी ७३ चे सर्वेक्षण झाले. यात १९ प्रस्ताव योग्य आढळले. यात हिंगोली-३, औंढा-८, सेनगाव-९, वसमत-२, कळमनुरी-८ अशी तालुकानिहाय संख्या आहे. एकूण ४१ योग्य तर ३१ अयोग्य आढळले. तात्पुरत्या पूरक दुरुस्तीचे ४४ योजनांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी २९ चे सर्वेक्षण झाले. यात हिंगोली-१0, सेनगाव-४ तर कळमनुरीतील दोन प्रस्ताव योग्य असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर औंढ्यात व वसमतमध्ये प्रत्येकी तीन ठिकाणचे टँकरचे प्रस्ताव योग्य असल्याचे आढळून आले आहे. १५ फेब्रुवारीअखेरचा हा अहवाल असून तो जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे. एवढे प्रस्ताव कामे करण्यायोग्य असल्याचा प्रशासनाचाच निर्वाळा असताना मंजुरी मात्र मिळत नसल्याची बोंब आहे.