महिलांवरील अत्याचाराचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 01:31 PM2020-10-07T13:31:15+5:302020-10-07T13:31:43+5:30
भाजपच्या माजी उपमहापौर साधना सुरडकर यांनी नारीशक्ती मंचच्या नेतृत्वात मंगळवारी देशभरात महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या विरोधात क्रांतीचौक येथे निदर्शने केली.
औरंगाबाद : भाजपच्या माजी उपमहापौर साधना सुरडकर यांनी नारीशक्ती मंचच्या नेतृत्वात मंगळवारी देशभरात महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या विरोधात क्रांतीचौक येथे निदर्शने केली.
विशेषत: उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेच्या विरोधात स्थानिक भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते शब्दही काढण्यास तयार नसताना माजी उपमहापौरांनी नारीशक्ती मंच या संघटनेच्या माध्यमातून एकत्र येत निषेध करीत उत्तर प्रदेश येथील नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली. या आंदोलनात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी महिला अत्याचारांचा जाहीर निषेध असे फलक हाती घेतले होते.
यासंदर्भात साधना सुरडकर यांनी सांगितले की, या आंदोलनातून आम्ही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये वाढणाऱ्या घटनांचा निषेध करत आहोत. यासह औरंगाबादमधील घटनेचाही आम्ही निषेध केला आहे.