एकाच कुुंटणखान्यावर बीडमध्ये पाचव्यांदा छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:10 AM2017-11-07T00:10:57+5:302017-11-07T00:11:06+5:30

चार वेळेस छापा टाकल्यानंतरही खुलेआम वेश्या व्यवसाय चालविणा-या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांनी सहाव्यांदा धाड टाकली.

Red on brothel | एकाच कुुंटणखान्यावर बीडमध्ये पाचव्यांदा छापा

एकाच कुुंटणखान्यावर बीडमध्ये पाचव्यांदा छापा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : चार वेळेस छापा टाकल्यानंतरही खुलेआम वेश्या व्यवसाय चालविणा-या कुंटणखान्यावर शिवाजीनगर पोलिसांनी सहाव्यांदा धाड टाकली. यामध्ये चार ग्राहकांसह तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंटी मात्र फरार आहे. ही कारवाई रविवारी सायंकाळी बीड शहरात करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या महिला बीड व कोलकता येथील असल्याचे समोर आले आहे. शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख मदिनाबी शेख इफ्तेखार (बीड) असे कुंटणखाना चालविणा-या आंटीचे नाव आहे. मदिनाबी ही सरपण विक्रीचा व्यवसाय करते. एका पत्र्याच्या शेडमध्ये ती वेश्या व्यवसाय चालवित होती. यापूर्वी याच कुंटणखान्यावर तब्बल पाच वेळेस पोलिसांनी छापा टाकल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. पाच कारवायानंतरही ही आंटी पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा वेश्या व्यवसाय चालवित असल्याचे समोर आले आहे.
दोन महिन्यांपासून पोलीस या कुंटणखान्याची माहिती घेत होते. रविवारी खबरी पाठविला. पीडित महिलेने ५०० रूपये स्वीकारताच पोलिसांना त्याने इशारा केला. तात्काळ छापा टाकला असता चार पुरुषांसह तीन महिलांना ताब्यात घेतले.
यातील दोन महिला मुळच्या कोलकता येथील रहिवासी असून सध्या अहमदनगरला स्थायिक आहेत. दरम्यान, या कारवाईने खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुधीर खिरडकर, पोनि घनश्याम पाळवदे, नानासाहेब लाकाळ, पोउपनि दीपाली गिते यांच्यासह दामिनी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, शिवाजीनगर पोलिसांनी केली. दीपाली गिते यांच्या फिर्यादीवरून शेख मदिनाबी या आंटीविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Red on brothel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.