ईडीचा राक्षसी कायदा रद्द करा, छगन भुजबळ यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 06:35 AM2022-04-12T06:35:37+5:302022-04-12T06:35:44+5:30

ईडीचा राक्षसी कायदा रद्द झाला पाहिजे, अशी मागणी सोमवारी येथे समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

Repeal ED law demands Chhagan Bhujbal | ईडीचा राक्षसी कायदा रद्द करा, छगन भुजबळ यांची मागणी

ईडीचा राक्षसी कायदा रद्द करा, छगन भुजबळ यांची मागणी

googlenewsNext

औरंगाबाद :

ईडीचा राक्षसी कायदा रद्द झाला पाहिजे, अशी मागणी सोमवारी येथे समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त समता परिषदेच्या वतीने आयोजित ओबीसी समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना सामाजिक समता पुरस्कार प्रदान सोहळ्यानंतर ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. भुजबळ म्हणाले की, या कायद्याचा दुरुपयोग वाढला आहे. विशेषत: जी राज्ये बिगरभाजपाशासित आहेत, तिथे याचा मोठा त्रास सुरू झाला आहे. जरा विरोधात बोलले की ईडीची पीडा लागलीच म्हणून समजा. हा लोकशाहीला धोका असून, तो वेळीच दूर केला गेला पाहिजे.

उज्ज्वला गॅस योजना व प्रधानमंत्री आवास योजनेसाठी जो डेटा वापरला जात आहे, तो ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी देताना केंद्र सरकार नाक मुरडते, असेही ते म्हणाले.

Web Title: Repeal ED law demands Chhagan Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.