औरंगाबाद : शहरातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी ७० गुन्हेगारांचे कायद्याच्या चौकटीतून आलेले एमपीडीए व तडीपारीचे प्रस्ताव निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचाराधीन आहेत.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी वारंवार समज देऊनही गुन्हेगार जुमानत नसल्याने अखेर ७० गुंडांचे प्रस्ताव आयुक्तालयात आलेले आहेत. त्यावर लवकरच कारवाई होण्याचे संकेतदेखील गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिले. शहरात वाढत्या चोऱ्यामाऱ्या, दुचाकी चोरी तसेच कारमधून बॅग चोरी या गुन्ह्यात पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे. त्या दृष्टीने खबऱ्यामार्फत माहिती काढण्यावर भर दिलेला आहे; परंतु टोळीची सखोल माहिती अद्याप हाती आलेली नाही.
याच प्रकारच्या गुन्हेगारी कारवाईत चोरट्यांनी वापरलेल्या पद्धती तपासल्या जात आहेत. स्थानिक पातळीवर गुन्हेगारी कारवाईत हात असलेल्या ७ जणांना नुकतेच तडीपार, एमपीडीए करण्यात आलेले आहेत. अजून ७० जणांवर ही कारवाई होणार आहे.