८६५ ग्रामपंचायतींमधील सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत ८ डिसेंबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:00 PM2020-11-26T12:00:07+5:302020-11-26T12:02:28+5:30
तालुकास्तरावर विशेष सभांचे आयोजन करण्याची तातडीची सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी
सोयगाव ( औरंगाबाद ) : औरंगाबाद जिल्ह्यातील एप्रिल-२०२० ते मार्च-२०२० या कालावधीत मुदत संपलेल्या ९ तालुक्यातील ८६५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. याबाबत तालुकास्तरावर विशेष सभांचे आयोजन करण्याची तातडीची सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यातील ८६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. त्यासाठी पूर्वतयारी अंतिम टप्प्यात आहे. येथील सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचे आयोजन ८ डिसेंबरला करण्याचे जिल्हाधिकारी चव्हाण यांनी तहसीलदार यांना आदेशित केले आहे. या आरक्षण सोडतीच्या वेळी कोविड-१९ च्या अनुषंगाने सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, ८ डिसेंबरला जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत होणार असल्याची माहिती आहे.
सोयगाव तालुक्यातील ४० ग्रामपंचायती
सोयगाव तालुक्यात मुदत संपलेल्या चाळीस ग्रामपंचायतीसाठी आठ डिसेंबरला विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. यात सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात येईल.