निवृत्त बीईओंवर हल्ला
By Admin | Published: April 6, 2016 12:02 AM2016-04-06T00:02:26+5:302016-04-06T00:52:31+5:30
गेवराई : माहिती अधिकारात वस्तीशाळेची माहिती मागविल्याने निवृत्त बीईओंवर शिक्षक पुतण्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री गाडेवाडीत घडली.
गेवराई : माहिती अधिकारात वस्तीशाळेची माहिती मागविल्याने निवृत्त बीईओंवर शिक्षक पुतण्याने तलवारीने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री गाडेवाडीत घडली.
लक्ष्मण तुळशीराम गाडे हे २०१० मध्ये गटशिक्षणाधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले. त्यांचा पुतण्या गाडेवाडी येथील वस्तीशाळेत शिक्षक आहे. डिसेंबर २०१५ मध्ये लक्ष्मण गाडे यांनी गावातीलच वस्तीशाळेबाबत माहिती अधिकारात माहिती मागविली होती. सायंकाळी शिक्षक नानासाहेब गाडे व इतरांनी लक्ष्मण गाडे यांच्या गाडेवाडी येथील घरावर हल्ला चढविला. लक्ष्मण गाडे हे कोळगावला होते. त्यांच्या पत्नी रेखा, मुलगा विशाल, विनोद, सून जया यांना काठीने मारहाण केली. त्यानंतर नानासाहेब याने कोळगावात जाऊन लक्ष्मण गाडे यांच्यावर तलवारीने वार केले. रक्तबंबाळ अवस्थेत नागरिकांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या जवाबावरुन चौघांवर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. (वार्ताहर)