मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनिल नाईक यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 02:52 PM2021-07-16T14:52:57+5:302021-07-16T14:54:07+5:30

२२ जानेवारी २००१ ला मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती व २१ जानेवारी २००३ ते २७ ऑक्टोबर २००५ पर्यंत कायम न्यायमूर्ती कार्यरत होते.

Retired Mumbai High Court Judge Anil Naik passes away | मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनिल नाईक यांचे निधन

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनिल नाईक यांचे निधन

googlenewsNext

औरंगाबाद : मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अनिल भालचंद्र नाईक (७८) यांचे शुक्रवारी (दि. १६) दीर्घ आजाराने निधन झाले.  त्यांचा अंत्यविधी दुपारी एन- ६ येथील स्मशानभूमीत झाला. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा, दोन विवाहित मुली मेखला हेमंत कुलकर्णी आणि अश्विनी नेवासेकर, जावई, नातवंडे असा परिवार आहे .

न्या. अनिल नाईक यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९४३ रोजी झाला होता. त्यांनी १८ ऑगस्ट १९७० पासून मुंबईला उच्च न्यायालयात आणि २६ ऑगस्ट १९८१ पासून औरंगाबाद खंडपीठात व मॅटमध्ये वकिली केली. १९८० ते १९८५ दरम्यान सहाय्यक सरकारी वकील म्हणून तर १९८६ ते १९८९ पर्यंत राज्य शासनाचे 'अ' वर्ग वकील म्हणून काम पाहिले. १९७७ ते १९८० दरम्यान ते मुंबईच्या के.सी. महाविद्यालयात अर्धवेळ अध्यापक म्हणून कार्यरत होते. २२ जानेवारी २००१ ला मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती व २१ जानेवारी २००३ ला कायम न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर २७ ऑक्टोबर २००५ ला ते निवृत्त झाले होते.

Web Title: Retired Mumbai High Court Judge Anil Naik passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.