महसूल आणि गृह विभाग लाचखोरीत पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:33 PM2019-08-03T23:33:28+5:302019-08-03T23:34:24+5:30

‘न खाऊंगा, न खाने दूँगा’, अशी घोषणा पंतप्रधानांनी दिली असली तरी तिची अंमलबजावणी किती कठीण आहे, याचा प्रत्यय लाचखोरीच्या गुन्ह्यांवरून येतो. मागील सात महिन्यांत तब्बल ६९९ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात अटक केली आहे. विशेष म्हणजे राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात पुढे असलेल्या महसूल विभागाने लाचखोरीतही अव्वल क्रमांक मिळविला आहे. शिवाय गुन्हेगारीला आळा घालण्याची आणि लाचखोरांना पकडण्याची जबाबदारी असलेल्या गृह विभागाचा दुसरा क्रमांक आहे.

Revenue and home department continue to bribe | महसूल आणि गृह विभाग लाचखोरीत पुढे

महसूल आणि गृह विभाग लाचखोरीत पुढे

googlenewsNext
ठळक मुद्देसात महिन्यांत ६९९ लाचखोर जाळ्यात; राज्यात ५२६ सापळे



बापू सोळुंके
औरंगाबाद : ‘न खाऊंगा, न खाने दूँगा’, अशी घोषणा पंतप्रधानांनी दिली असली तरी तिची अंमलबजावणी किती कठीण आहे, याचा प्रत्यय लाचखोरीच्या गुन्ह्यांवरून येतो. मागील सात महिन्यांत तब्बल ६९९ लाचखोरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात अटक केली आहे. विशेष म्हणजे राज्यात उत्पन्नाच्या बाबतीत सर्वात पुढे असलेल्या महसूल विभागाने लाचखोरीतही अव्वल क्रमांक मिळविला आहे. शिवाय गुन्हेगारीला आळा घालण्याची आणि लाचखोरांना पकडण्याची जबाबदारी असलेल्या गृह विभागाचा दुसरा क्रमांक आहे.
पकडण्यात आलेल्या लाचखोरांमध्ये वर्ग १ च्या २४, तर वर्ग २ च्या ५७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या आरोपींना पकडल्यामुळे १ कोटी २१ लाख ३६ हजार ३३५ रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी लाचखोरांवरील कारवाईचे प्रमाण पाच टक्क्यांनी अधिक आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, मुंबई, नाशिक, पुणे, अमरावती, नांदेड आणि नागपूर आदी ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची परिक्षेत्रीय कार्यालये आहेत. पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी प्रत्येक परिक्षेत्राचा प्रमुख असतो. शिवाय प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्याच्या ठिकाणीही अधिकारी कार्यरत असतात. प्राप्त माहितीनुसार १ जानेवारी ते १ आॅगस्टदरम्यान राज्यात तब्बल ५२६ तक्रारी राज्यातील विविध कार्यालयांत दाखल झाल्या होत्या. या तक्रारीनुसार अधिकाऱ्यांनी सापळे रचले. या कारवाईत लाच घेताना ६९९ सरकारी अधिकारी, कर्मचाºयांना आणि त्यांच्या पंटर्सना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. लाचखोरीमध्ये महसूल विभाग नेहमीप्रमाणे अव्वल असल्याचे समोर आले आहे. सात महिन्यांत महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभागातील तब्बल १७० जणांना लाच प्रकरणात अटक झाली. यात वर्ग १ चे पाच, तर वर्ग दोनचे सात अधिकारी आहेत. या आरोपींना पकडल्यामुळे १ कोटी २१ लाख ३६ हजार ३३५ रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.


बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी १८ अटकेत
शासकीय पदावर कार्यरत असताना मिळणाºया उत्पन्नापेक्षा वरकमाई करणाºया अधिकारी, कर्मचाºयांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जाते. या चौकशीत बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी १८ जणांविरोधात ११ गुन्ह्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नोंद करण्यात आली. याशिवाय अन्य भ्रष्टाचार प्रकरणांतील चार गुन्हे नोंदवून पोलिसांनी १० जणांना अटक केली.
बडतर्फीच्या इशाºयानंतरही पोलीस दुसºया क्रमांकावर
लाच घेताना पकडल्यानंतर पोलीस कर्मचाºयांवर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी दिला होता. या इशाºयानंतरही हे खाते राज्यात लाचखोरीमध्ये दुसºया क्रमांकावर असल्याचे समोर आले. सात महिन्यांच्या कालावधीत राज्यातील १६० पोलिसांना लाच घेताना पकडण्यात आले. यात वर्ग एक आणि दोनचे प्रत्येकी सात अधिकारी आहेत.

Web Title: Revenue and home department continue to bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.