अवैध गॅस रिफिलिंग कारवाईच्या अधिकारावरून महसूल-पोलिसांत वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:55 PM2017-12-08T23:55:56+5:302017-12-08T23:56:00+5:30

अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर गुन्हे शाखा पोलिसांनी धाड मारल्यानंतर या प्रकरणी संयुक्त पंचनामा करून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यावरून महसूल आणि गुन्हे शाखा अधिका-यांत गुरुवारी तब्बल पाच तास वाद रंगला.

 Revenue-Police dispute over illegal gas refinancing action | अवैध गॅस रिफिलिंग कारवाईच्या अधिकारावरून महसूल-पोलिसांत वाद

अवैध गॅस रिफिलिंग कारवाईच्या अधिकारावरून महसूल-पोलिसांत वाद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर गुन्हे शाखा पोलिसांनी धाड मारल्यानंतर या प्रकरणी संयुक्त पंचनामा करून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यावरून महसूल आणि गुन्हे शाखा अधिका-यांत गुरुवारी तब्बल पाच तास वाद रंगला. हा खळबळजनक प्रकार गुरुवारी हर्सूल पोलीस ठाण्यात झाला. वारंवार विनंती केल्यानंतरही महसूल अधिकाºयांनी तक्रार नोंदविली नाही. शेवटी पोलिसांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवून गुन्हा नोंदविला.
जटवाडा रोडवरील एका हॉस्पिटलजवळील मोकळ्या जागेवर रिक्षात अवैधरीत्या कमर्शियल गॅस सिलिंडरमधून विद्युत मोटारीच्या मदतीने गॅस भरण्यात येत असल्याची माहिती खबºयाकडून गुन्हे शाखेला मिळाली. पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे यांनी या कारवाईसाठी महसूल विभागाच्या अधिकाºयांना पत्र पाठवून कारवाईसाठी सोबत येण्याची विनंती केली. वारंवार संपर्क साधूनही महसूल अधिकाºयांना येण्यास विलंब होत असल्याचे पाहून उपनिरीक्षक धोंडे यांच्या पथकाने त्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर धाड मारली. तेव्हा तेथे चार आरोपी विद्युत मोटारीच्या मदतीने सिलिंडरमधील गॅस दोन रिक्षांच्या गॅस टाकीत भरत असल्याचे त्यांना दिसले. यानंतर पोलिसांनी आरोपी पप्पू मीर हिनायत अली, (रा. शहाबाजार), इरफानबाबा पटेले, (बेरिबाग), अंकुश सुखदेव मोकळे (रा.भक्तीनगर) आणि रिक्षाचालक भास्कर अण्णासाहेब लेंभे यांना पकडले. त्यांच्याकडून दोन आॅटो रिक्षा, इलेक्ट्रिक मोटारपंप, एचपी कंपनीचे सात कमर्शियल गॅस सिलिंडर, रेग्युलेटर, दोन वजन काटे आणि रोख ६ हजार ४२०रुपयांचा ऐवज आढळला. कारवाई पूर्ण होत आली तेव्हा महसूलचे अधिकारी तेथे दाखल झाले. यावेळी पोलिसांच्या विनंतीनंतर त्यांनी संयुक्त पंचनामा केला. या पंचनाम्यानंतर हर्सूल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा पोलिसांनी महसूल अधिकाºयांना आग्रह केला. तेव्हा महसूल अधिकाºयांनी गुन्हा नोंदविण्यास स्पष्ट नकार देत, आमच्या पद्धतीनुसार आम्ही त्या आरोपींविरोधात कारवाई करू, अशी भूमिका घेतली. एवढेच नव्हे तर पंचनाम्याच्या पत्रासोबत महसूल विभागाचे स्वतंत्र पत्र तरी पोलिसांना द्या, अशी विनंती अधिकारी करीत होते. मात्र ते पत्रही देण्यास टाळाटाळ करीत होते. आमच्या विभागात तुम्ही हस्तक्षेप कशाला करता, असा सवाल महसूल अधिकाºयांनी पोलिसांना उपस्थित केला. तेव्हा त्यांना काय सांगावे, हे पोलिसांना सुचेना. महसूल अधिकारी ऐकतच नसल्याने शेवटी पोलीस उपनिरीक्षक धोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title:  Revenue-Police dispute over illegal gas refinancing action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.