औरंगाबाद : सरस्वती भुवन शिक्षण संस्थेतर्फे आयोजित क्रीडा महोत्सवात रांजणी येथील स. भु. प्रशालेने कबड्डीत तिहेरी मुकुट पटकावला. व्हॉलीबॉलमध्ये मुलांच्या १७ वर्षांखालील वयोगटात औरंगाबादचा संघ अजिंक्य ठरला.अंतिम निकाल (कबड्डी १४ वर्षांखालील मुले) : १. रांजणी, २. भराडी, जालना. मुली : १. रांजणी, २. वडोदबाजार, ३. बिडकीन. १७ वर्षांखालील मुले : १. रांजणी, २. वडोदबाजार, ३. औरंगाबाद. मुली : १. भराडी, २. गोंदेगाव, ३. जालना.व्हॉलीबॉल (१४ वर्षांखालील मुले) : १. गोंदेगाव, २. बिडकीन, ३. औरंगाबाद. मुली : १. गोंदेगाव, २. वडोदबाजार, ३. भराडी. १७ वर्षांखालील मुले : १. औरंगाबाद, २. गोंदेगाव, ३. बिडकीन. मुली : १. गोंदेगाव, २. भराडी, ३. वडोदबाजार. खो-खो (१४ वर्षांखालील मुले) : १. औरंगाबाद, २. बिडकीन, ३. वडोदबाजार. मुली : १. रांजणी, २. औरंगाबाद, ३. बालानगर. १७ वर्षांखालील मुले : १. वडोदबाजार, २. बिडकीन, ३. कुंभार पिंपळगाव. मुली : १. बालानगर, २. कुंभारपिंपळगाव, ३. भराडी. कुस्ती (७४ किलो) : १. देवकुमार दुबे (औरंगाबाद), २. केतन चव्हाण (बालानगर). ६0 किलो : १. वैभव वाघ (रांजणी), २. ए. रफिक (गोंदेगाव). ६६ किलो : १. सुभाष ब्राह्मणे (वडोदबाजार), २. अबुजर बागवान (रांजणी). ५५ किलो : १. आकाश मिरगे (भराडी), २. सचिन नरवडे (औरंगाबाद), ३. दीपक जाधव (गोंदेगाव). ५0 किलो : १. संदीप राठोड (गोंदेगाव), २. आजिनाथ गुंजाळ (वडोदबाजार), ३. कृष्णा साळवे (भराडी). ४६ किलो : १. रमेश जाधव (बिडकीन), २. गणेश धनवटे (रांजणी), ३. समाधान शेवलकर (गोंदेगाव). ४२ किलो : १. ताराचंद राठोड (बिडकीन), २. अतुल राऊत (भराडी), ३. कृष्णा साठे (बालानगर). बक्षीस वितरण आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक डॉ. बीरसिंग यादव, व्हॉलीबॉलपटू गुरबिंदरसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी सरचिटणीस अॅड. दिनेश वकील, सहचिटणीस श्रीरंग देशपांडे, ज्ञानप्रकाश मोदाणी, जुगलकिशोर धूत, अमोल भाले, साधना शाह, अरुण कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष पुंडलिकराव खोमणे, मनोहर तौर, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रशालांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका यांची उपस्थिती होती. क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे, विशाल देशपांडे, आयोजन समिती सचिव सतीश पाठक, चंद्रशेखर पाटील, सुरेखा देव-कुलकर्णी, शिरीष मोरे, अनिल देशमुख, पूनम राठोड, उदय पंड्या, मंगेश डोलारे, सुरेश म्हस्के, प्रेम गोरमे, पद्माकर इंगळे, मंजूषा फडके, अलका कलकोटे, संगीता जहागीरदार, हेमलता जगताप, राहुल अहिरे आदींनी परिश्रम घेतले.
स. भु. क्रीडा महोत्सवात कबड्डीत रांजणी संघाला तिहेरी मुकुट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:16 AM