औरंगाबाद : फलंदाजांची उपयुक्त खेळी आणि त्यानंतर रामेश्वर दौड याची तेजतर्रार भेदक गोलंदाजी या बळावर जालना येथील साई काणे अकॅडमी संघाने स्टार फलंदाजांचा भरणा असणाऱ्या पंकज युनायटेड संघावर तब्बल ५७ धावांनी सनसनाटी विजय मिळवताना गरवारे क्रीडा संकुलावर आज झालेली टी-२0 क्रिकेट स्पर्धा जिंकली.अजिंक्य गोरे व हिंदुराव देशमुख यांनी ४७ चेंडूंत दिलेली ५४ धावांची सलामी आणि त्यानंतर तळातील फलंदाज रामेश्वर दौड व स्वप्नील पठारे व रामेश्वर इंगळे यांनी अखेरच्या तीन षटकांत केलेल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर साई काणे अकॅडमीने २0 षटकांत ८ बाद १४४ धावा ठोकल्या. विशेष म्हणजे नवव्या क्रमांकावरील स्वप्नील पठाडे व रामेश्वर इंगळे यांनी रणजीपटू सय्यद वहीद याच्या एकाच षटकात २ चौकार व २ षटकार ठोकत एकूण २0 धावा वसूल करताना काणे अकॅडमीला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. त्यांच्याकडून अजिंक्य गोरेने ३ चौकारांसह सर्वाधिक ३0 धावा केल्या. हिंदुराव देशमुखने २१, रामेश्वर दौडने १४ चेंडूंत १९, स्वप्नील पठारेने ८ चेंडूंत २ चौकार व एका षटकारासह नाबाद १७ व रामेश्वर इंगळेने ५चेंडूंत एक षटकार व एका चौकारासह १0 धावा केल्या. कर्णधार ऋषिकेश काळेने १५ व नचिकेत मुळकने १७ धावांचे योगदान दिले. पंकज युनायटेडकडून ऋषिकेश नायरने २0 धावांत ३ व सय्यद वहीद व भास्कर जिवरग यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.प्रत्युत्तरात रामेश्वर दौडने त्याच्या पहिल्याच षटकात असीफ खान (४) आणि सतीश भुजंगे (0१) यांना बाद करीत पंकज युनायटेडला जोरदार धक्के दिले. त्याची तेजतर्रार आणि जबरदस्त स्विंग गोलंदाजी आणि त्याला मिळालेली शोएब सय्यदची सुरेख साथ यामुळे पंकज युनायटेडचे ६ फलंदाज ४.४ षटकांत अवघ्या १९ धावांतच तंबूत परतले. यातून त्यांचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही आणि अखेर पंकज युनायटेडचा संघ १७.१ षटकांत ८७ धावांत कोसळला. त्यांच्याकडून सचिन शेडगेने २ चौकार व एका षटकारासह २१, सय्यद वहीदने २ चौकार व एका षटकारासह १८ व अनिल अहेवाडने १३ धावा केल्या. साई काणे अकॅडमीकडून रामेश्वर दौडने ३0 धावांत ५ गडी बाद केले. शोएब सय्यदने १३ धावांत २, तर ऋषिकेश काळे व झुबेर कुरैशी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. अंतिम सामन्यानंतर जिल्हा क्रिकेट संघटनेचे सहसचिव शिरीष बोराळकर, मिहिर मुळे, हरिभाऊ लहाने, हेमंत मिरखेलकर, ज्येष्ठ क्रिकेटपटू महेंद्रसिंग कानसा, संजय डोंगरे, हिदायत खान यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. याप्रसंगी विजय अडलाकोडा, स्पर्धा संयोजक विवेक येवले, सय्यद जमशीद, सचिन पाटील, इनायत अली, पंकज फलके, शेख इफ्तेखार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमृत बिºहाडे यांनी केले.स्पर्धेचे मानकरीमालिकावीर : ऋषिकेश काळेफलंदाज : विश्वजित राजपूतगोलंदाज : ऋषिकेश नायरसामनावीर : रामेश्वर दौडसंक्षिप्त धावफलकसाई काणे अकॅडमी : २0 षटकांत ८ बाद १४४. (अजिंक्य गोरे ३0, हिंदुराव देशमुख २१, रामेश्वर दौड १९, स्वप्नील पठाडे नाबाद १७, रामेश्वर इंगळे १0. ऋषिकेश नायर ३/२0, सय्यद वहीद १/३६, भास्कर जिवरग १/३0).पंकज युनायटेड : १७.१ षटकांत सर्वबाद ८७. (सचिन शेडगे २१, सय्यद वहीद १८, अनिल आहेवाड १३. रामेश्वर दौड ५/३0, शोएब सय्यद २/१३, ऋषिकेश काळे १/१८, झुबेर कुरेशी १/२)
जालना येथील साई काणे अकॅडमी चॅम्पियन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 12:54 AM
फलंदाजांची उपयुक्त खेळी आणि त्यानंतर रामेश्वर दौड याची तेजतर्रार भेदक गोलंदाजी या बळावर जालना येथील साई काणे अकॅडमी संघाने स्टार फलंदाजांचा भरणा असणाऱ्या पंकज युनायटेड संघावर तब्बल ५७ धावांनी सनसनाटी विजय मिळवताना गरवारे क्रीडा संकुलावर आज झालेली टी-२0 क्रिकेट स्पर्धा जिंकली. अजिंक्य गोरे व हिंदुराव देशमुख यांनी ४७ चेंडूंत दिलेली ५४ धावांची सलामी आणि त्यानंतर तळातील फलंदाज रामेश्वर दौड व स्वप्नील पठारे व रामेश्वर इंगळे यांनी अखेरच्या तीन षटकांत केलेल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर साई काणे अकॅडमीने २0 षटकांत ८ बाद १४४ धावा ठोकल्या.
ठळक मुद्देअंतिम सामना : औरंगाबादच्या पंकज युनायटेड संघावर सनसनाटी विजय