साजापुरात पावणे दोन लाखांचा गुटखा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 08:47 PM2019-04-04T20:47:14+5:302019-04-04T20:48:01+5:30
अन्न व औषधी प्रशासन आणि एमआयडीसी वाळूज पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत बुधवारी रात्री साजापुरात छापा मारुन जवळपास पावणे दोन लाखांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे.
वाळूज महानगर : अन्न व औषधी प्रशासन आणि एमआयडीसी वाळूज पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत बुधवारी रात्री साजापुरात छापा मारुन जवळपास पावणे दोन लाखांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून, तिघांचा शोध सुरु आहे.
साजापुरात गुटखा व सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची पोलिसांना मिळाली. त्यानुसार साजापुरात सापळा रचण्यात आला. अन्न व औषधी विभाग आणि पोलीस पथक बुधवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तेथे गेले असता दोन संशयित तरुण गोण्या ठेवत असल्याचे दिसून आले. पोलिस पथक आल्याची चाहुल लागतच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिस पथकाने अझहरुदीन मोहम्मद बेग (२९) यास पकडले तर त्याचा छोटा भाऊस आश्रफ बेग हा पसार झाला. यानंतर पथकाने गोण्यांची तपासणी केली असता त्यात सुगंधित पान मसाला व जर्दाचा साठा मिळून आला आहे. याची बाजार किमत १ लाख ६८ हजार ९१२ रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पकडलेला अझहरुद्दीन बेग हा सराईत गुन्हेगार असून, शेख आश्रफ व शेख नदीम या दोघांचा पोलीस शोध घेत आहे. या प्रकरणी अन्न व सुरक्षा अधिकारी योगेश कणसे यांच्या तक्रारीवरुन तिघांविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.