सत्तरांच्या पक्षांतराने शिवसेनेची जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 06:09 PM2019-09-04T18:09:15+5:302019-09-04T18:14:26+5:30

भाजपच्या सत्ता स्वप्नांना लागणार ब्रेक 

by Sattar's enrty Will the Shiv Sena get a unilateral power in the Zilla Parishad ? | सत्तरांच्या पक्षांतराने शिवसेनेची जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता येणार?

सत्तरांच्या पक्षांतराने शिवसेनेची जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता येणार?

googlenewsNext
ठळक मुद्देसत्तरांच्या पक्षांतराचे परिणाम अध्यक्षपद पुढेही देणार हुलकावणी 

- राम शिनगारे

औरंगाबाद : काँग्रेसचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे जिल्ह्यातील विविध समीकरणे बदलणार आहेत. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने जि. प. अध्यक्षपदावर दावा केलेला असतानाच आता सत्तारांच्या प्रवेशाने शिवसेना जि.प.तील सत्ता स्वबळावर ताब्यात घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपच्या सत्ता स्वप्नांना ब्रेक लागणार असून, अध्यक्षपदाचा दावाही सोडून द्यावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार अंबादास दानवे यांना मतदान करण्यासाठी भाजपच्या जि. प. सदस्यांना वारंवार विनंती करावी लागली होती. तेव्हा सदस्यांनी जि.प.तील काँग्रेससोबतच्या युतीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी शिवसेनेने आगामी जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला सोबत घेण्याचा शब्द दिला होता. जि.प.तील सर्वात मोठा पक्ष म्हणून अध्यक्षपदावर भाजपने दावाही केला. मात्र राज्य शासनाने विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जि.प. अध्यक्षपदाच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना तीन महिन्यांचा अधिक कालावधी मिळाला आहे. जि.प. मध्ये शिवसेनेचा अध्यक्ष आणि सत्तार समर्थक काँग्रेसचे केशवराव तायडे पाटील हे उपाध्यक्ष आहेत. सभापती पदेही दोन्ही पक्षांनी आपसात वाटून घेतलेली आहेत. सर्वात मोठ पक्ष असूनही विरोधात बसावे लागल्याचे शल्य भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आजही आहे. त्यांनी वारंवार बोलूनही दाखविले.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेससोबत असलेली युती तोडण्याची भाजपची मागणी मान्य केली होती. त्याची अंमलबजावणी येत्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत करण्याचे आश्वासन दिले होते. संभाव्या युतीनुसार भाजपचे संख्याबळ अधिक असल्यामुळे अध्यक्षपदाचा दावा अधिक होता. मात्र आत काँग्रेसचे आ. सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे त्यांचे समर्थक जि.प.सदस्यही शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ भाजपपेक्षा अधिक होणार आहे. याविषयी उपाध्यक्ष केशवराव तायडे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सत्तार यांच्यासोबत काँग्रेसच्या १६ सदस्यांपैकी ११ जण असल्याचे सांगितले. तसेच माजी आमदार कल्याण काळे यांचे समर्थक असलेल्या काँग्रेसच्या उर्वरित ५ सदस्यांनाही शिवसेनेचे वावडे नाही. त्यामुळे सत्तास्थाने ‘जैसे थे’ राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या १५ दिवसांमध्ये जि.प.च्या राजकीय वर्तुळात अधिक घडामोडी घडतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

असा असणार संख्याबळाचा खेळ
जि. प. सदस्यांची एकूण संख्या ही ६२ एवढी आहे. यामध्ये भाजपचे २३, शिवसेना १८, काँग्रेस १६, राष्ट्रवादी काँग्रेस ३ (उदयसिंग राजपूत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांच्या जि.प. सदस्य पत्नी शिवसेना समर्थक आहेत.), मनसे १ आणि रिपाइं डेमोक्रॅटिक १, असे संख्याबळ आहे. यातील आ. सत्तार समर्थक काँग्रेसच्या ११ सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यास शिवसेनेचे संख्याबळ ३० वर पोहोचत आहे. तर बहुमतासाठी ३२ सदस्यांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे उर्वरित ५ सदस्यही शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपच्या सत्ता मिळविण्याच्या स्वप्नाला सुरुंग लागणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Web Title: by Sattar's enrty Will the Shiv Sena get a unilateral power in the Zilla Parishad ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.