सावतावाडी तलावाला भेगा

By Admin | Published: October 12, 2016 12:51 AM2016-10-12T00:51:00+5:302016-10-12T01:13:33+5:30

वैजापूर : तब्बल सहा वर्षांनंतर १०० टक्के भरलेल्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील सावतावाडी लघु तलावाच्या भिंतीला ८०० फुटापर्यंत सरळ रेषेत भेगा पडल्याने खळबळ उडाली आहे.

Savtaawadi lake | सावतावाडी तलावाला भेगा

सावतावाडी तलावाला भेगा

googlenewsNext


वैजापूर : तब्बल सहा वर्षांनंतर १०० टक्के भरलेल्या वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील सावतावाडी लघु तलावाच्या भिंतीला ८०० फुटापर्यंत सरळ रेषेत भेगा पडल्याने खळबळ उडाली आहे. तलावाची तात्काळ दुरुस्ती न केल्यास परिसरातील खंडाळा, पानगव्हाण व सावतावाडी गावाला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने या गावांत घबराट पसरली आहे.
खंडाळा येथील सावतावाडी लघु तलावाचे काम १९७२ मध्ये झालेले आहे. २०१० मध्ये या तलावाच्या भिंतीची ३ फुट उंची वाढविण्यासाठी पाटबंधारे विभागाने एका गुत्तेदाराला काम दिले होते. मात्र संबंधित गुत्तेदाराने मुरूम,दगडाची पेचिंग न करता केवळ जेसीबीद्वारे तलावामधील काळी माती टाकून बिले उचलली असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.
सहा वर्षानंतर हा तलाव १००टक्के भरला असून आजघडीला या तलावात ०.५६१ द.ल.घ.मी. जलसाठा असून उपयुक्त जलसाठा ०.४७७ द.ल.घ.मी. इतका आहे. गेल्या महिन्यापासून या परिसरावर वरुणराजा चांगलाच मेहरबान आहे. सततच्या दमदार पावसामुळे हा तलाव ओसंडून वाहत आहे. मात्र काही दिवसांपासून तलावाच्या भिंतीला भेगा पडत असल्याचे परिसरातील नागरिकांना लक्षात आल्याने त्यांनी तातडीने याची माहिती खंडाळा ग्रामपंचायतला कळवली. सरपंच जमुनाबाई संजय सूर्यवंशी, उपसरपंच साजीद खान यांनी तातडीने काही सदस्य सोबत घेऊन तलावाची पाहणी केली. तलावाच्या भिंतीला ८०० फुट लांब व ३ फुट खोल भेग पडल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतीने याची माहिती तातडीने संबंधित विभागाला कळविल्यानंतर मंगळवारी पाटबंधारे विभागातील शाखा अभियंता डी.पी.पाटील, स्थापत्य अभियंता बी.पी.गायके यांनी तलावाची पाहणी केली. यावेळी परिसरातील नागरिकांनी तलावावर गर्दी केली होती.

Web Title: Savtaawadi lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.