शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांनी गजबजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 07:58 PM2018-11-26T19:58:07+5:302018-11-26T20:02:06+5:30
औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (दि.१६) सुरूवात झाली. शाळा तब्बल २१ दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर गजबजल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला.
औरंगाबाद : दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक सत्राला सोमवारपासून (दि.१६) सुरूवात झाली. शाळा तब्बल २१ दिवसांच्या दीर्घ सुटीनंतर गजबजल्या. औरंगाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील स्थलांतरीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला.
दिवाळीच्या सुटीनंतर शैक्षणिक वर्षातील दुसरे सत्र सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साह आहे. औरंगाबादमध्ये इतर सत्रात सुट्या कमी असल्याने, दिवाळीतील सुट्या अधिक असतात. २१ दिवसांच्या सुटीच्या विश्रांतीनंतर शाळा सुरू होणार असल्याने शाळांनीही तयारी केली आहे. शाळा सोमवारी सुरू होत असल्याचे संदेश पालकांना मोबाइलवर पाठविण्याची सुविधाही काही शाळांनी केली आहे. अनेक शाळांत मुलांचे गुलाबपूष्प देऊन स्वागत करण्यात आले.
पूर्वसंध्येला शाळांनी वर्गांची साफसफाई केली. सुट्यानंतर नियमितपणे वर्ग भरणार असल्याने तशी तयारी आणि पहिल्या सत्रातील परीक्षांमधील गुण ही विद्यार्थ्यांना अनेक शाळांमध्ये कळविण्यात येतात. दिवाळी सुट्यात दिलेले होमवर्कही तपासण्यात येते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य आणि स्थलांतर विद्यार्थ्यांचा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठभ शिक्षण विभागाकडून पहिल्याच दिवशी आढावा घेण्यात आला.
प्रत्येक शाळेतील शिक्षकांना तशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. स्थलांतर रोखण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील १०० टक्के स्थलांतरित झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत आणण्यात येणार असून, त्यासाठी बालरक्षक पथके राज्यभरात फिरत असल्याची माहिती जि.प.प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी दिली.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाविद्यालयातील शैक्षणिक सत्रालाही सुरूवात झाली. तासिकांनाही सुरूवात करण्यात आली असून,यात काही ठिकाणी परीक्षांही सुरू आहे.