लोकशाहीसाठी काँग्रेसला निवडून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:31 AM2018-04-10T00:31:50+5:302018-04-10T10:32:26+5:30
देशातील सामाजिक एकोपा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन आज येथे काँग्रेसच्या नेत्यांनी केले. देशातील वाढत्या दलित अत्याचाराविरोधात देशभर काँग्रेसतर्फे सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशातील सामाजिक एकोपा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन आज येथे काँग्रेसच्या नेत्यांनी केले. देशातील वाढत्या दलित अत्याचाराविरोधात देशभर काँग्रेसतर्फे सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर व जिल्हा काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने शहागंजमधील गांधी पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भाषणे करून मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली व या सरकारमुळे देश कसा हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे व सामाजिक एकोपा कसा धोक्यात येत चालला आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला.
जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, आमदार सुभाष झांबड, केशवराव औताडे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, डॉ. कल्याण काळे, जि.प.चे उपाध्यक्ष केशवराव तायडे, समता सैनिक दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, किरण पा. डोणगावकर आदींच्या नेतृत्वाखाली हे उपोषण झाले. त्यात रेखा जैस्वाल, रवींद्र काळे, जितसिंग करकोटक, शेषराव तुपे पाटील, अॅड. सुभाष देवकर, बबनराव डिडोरे पाटील, कल्याण कावरे, किशोर तुळसीबागवाले, अतिष पितळे, अॅड. इक्बालसिंग गिल, रामभाऊ शेळके, यशवंत कदम, संदीप बोरसे, जगन्नाथ खोसरे, पपींद्रपालसिंग वायटी, सागर साळुंके, मुदस्सर अन्सारी, इब्राहिम पठाण, सायली जमादार, अर्चना मंत्री, पंकजा माने, विजया भोसले, संजीवनी महापुरे, अनिता भोसले, सीमा थोरात, सरोज जेकब, उज्ज्वला दत्त, जयपाल दवणे, योगेश मसलगे पाटील, हरिभाऊ राठोड, सचिन शिरसाट, अनिल श्रीखंडे, डॉ. जितेंद्र देहाडे, डॉ. पवन डोंगरे, अॅड. सय्यद अक्रम, नंदकिशोर सहारे, अल्ताफ पटेल, राजूकाका नरवडे, वैशाली राऊत, प्रदीप मोहिते, प्रकाश वाघमारे, बाबूराव कावसकर, उत्तम दणके, नायबराव दाभाडे, जगदीश लहाने, संतोष भिंगारे, सुरेश पवार, प्रवीण निकम पाटील, सलमा सलीम पठाण, नसरीन पठाण, आकेफ रजवी, संगीता लहुगीर, शुकंतला साबळे, माया बागूल, बाळासाहेब भोसले, कमालखाँ पठाण, कैलाश उकिर्डे आदींनी सहभाग घेतला. भर उन्हात हे उपोषण करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
जिल्हाभरातील शेकडो पदाधिका-यांचा सहभाग
सकाळी १० ते ५ यावेळेत शहर व जिल्हा काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने हे उपोषण करण्यात आले. यात जिल्हाभरातील कार्यकर्ते, महिला, युवक, सेवादल आदींनी सहभाग घेतला. प्रारंभी, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.