शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, शास्त्रज्ञ डाॅ. मानवेंद्र काचोळे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 11:13 PM2021-01-27T23:13:38+5:302021-01-27T23:14:17+5:30

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव, शास्त्रज्ञ डॉ मानवेंद्र सखाराम काचोळे यांचे बुधवारी (दि.२७) सायंकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.

Senior leader of the farmers' association, scientist Dr. Manvendra Kachole passed away | शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, शास्त्रज्ञ डाॅ. मानवेंद्र काचोळे यांचे निधन

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते, शास्त्रज्ञ डाॅ. मानवेंद्र काचोळे यांचे निधन

googlenewsNext

औरंगाबाद : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलसचिव, शास्त्रज्ञ डॉ मानवेंद्र सखाराम काचोळे यांचे बुधवारी (दि.२७) सायंकाळी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला, यातच त्यांची प्राणज्योत मालवली. मे २०१४ मध्ये ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील जिवरसायनशास्त्र विभागप्रमुख, प्राध्यापक यापदावरून सेवानिवृत्त झाले.  २००९-१० या काळात ते कुलसचिव तसेच २००६ ते २०१० काळात ते विभागप्रमुख व्यवस्थापन परिषद सदस्य होते. शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्यासोबत त्यांनी अखेरपर्यंत काम केले. सध्या ते शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीवर कार्यरत होते. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. याच पक्षाच्या वतीने २००४ मध्ये परभणी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

Web Title: Senior leader of the farmers' association, scientist Dr. Manvendra Kachole passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.