औरंगाबाद 'मध्य'मध्ये फडकला शिंदेंसेनेचा झेंडा, प्रदीप जैस्वाल ८ हजार ११९ मतांनी विजयी

By संतोष हिरेमठ | Published: November 23, 2024 05:22 PM2024-11-23T17:22:18+5:302024-11-23T17:24:03+5:30

प्रदीप जैस्वाल हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. परंतु  १४ व्या फेरीपर्यंत २६ हजारांवरून १,७६० मतांनी आघाडीवर आले.

Shinde Shiv sena's flag flutters in Aurangabad Central constituency 2024, Pradeep Jaiswal wins by 8 thousand 119 votes | औरंगाबाद 'मध्य'मध्ये फडकला शिंदेंसेनेचा झेंडा, प्रदीप जैस्वाल ८ हजार ११९ मतांनी विजयी

औरंगाबाद 'मध्य'मध्ये फडकला शिंदेंसेनेचा झेंडा, प्रदीप जैस्वाल ८ हजार ११९ मतांनी विजयी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिंदेंसेनेचा झेंडा फडकला. शिंदेंसेनेचे प्रदीप जैस्वाल यांनी ८ हजार ११९  मतांनी आघाडी घेत विजय मिळविला.  'एमआयएम'चे नासेर सिद्दीकी दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

'मध्य'मध्ये अंतिम म्हणजे २३ व्या फेरीअखेरपर्यंत शिंदेंसेनेचे प्रदिप जैस्वाल यांना ८४  हजार २०२ मते मिळाली आहेत. तर 'एमआयएम' चे नासेर सिद्दीकी यांना ७६  हजार ९०१  मिळाली.  उध्दवसेनेचे बाळासाहेब थोरात यांना ३६ हजार ३९० मते मिळाली आहेत. पोस्टलमध्ये जैस्वाल यांना १२५७ आणि सिद्दीकी यांना ४३९ मते मिळाली.

प्रदीप जैस्वाल हे पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. परंतु  १४ व्या फेरीपर्यंत २६ हजारांवरून १,७६० मतांनी आघाडीवर आले. १५ व्या फेरीत नासेर सिद्दीकी यांनी आघाडी घेत जैस्वाल यांना मागे टाकले. त्यानंतर नासेर सिद्दीकी १८ व्या फेरीपर्यंत नासेर सिद्दीकी आघाडीवर होते. परंतु १९ व्या फेरीत जैस्वाल यांनी पुन्हा आघाडी घेत नासेर सिद्दीकी यांना मागे टाकले. ही आघाडी २३ व्या फेरीपर्यंत कायम ठेवत जैस्वाल यांनी विजय मिळविला.

Web Title: Shinde Shiv sena's flag flutters in Aurangabad Central constituency 2024, Pradeep Jaiswal wins by 8 thousand 119 votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.