औरंगाबाद : समाधानकारक पावसाअभावी मराठवाड्यात अजूनही संपूर्ण क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. विभागात आतापर्यंत ७२ टक्के म्हणजे ३२ लाख हेक्टरवरच पेरणी झाली आहे. उर्वरित ११ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी व्हायची आहे. पेरणीचा हंगाम निघून गेल्यामुळे या क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आता कमीच आहे. मराठवाड्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ४३ लाख ९४० हेक्टर आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे २५ लाख हेक्टर कपाशीखाली आहे. उर्वरित क्षेत्रावर सोयाबीन, मका, तूर, मूग, उडीद, बाजरी आदी पिके घेतली जातात. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे खरिपाचे क्षेत्र घटले आहे. मराठवाड्यात यंदा जून महिना कोरडा गेल्यामुळे कुठेही पेरण्या होऊ शकल्या नाहीत. जुलै महिन्यात पाऊस आल्यावर पेरण्यांना सुरुवात झाली; पण तरीही एक-दोन वेळाच जोरदार पाऊस झाला. नंतर पेरणीजोगा पाऊस न झाल्यामुळे अजूनही बहुतेक ठिकाणी पेरण्या व्हायच्या आहेत. जुलै अखेरीस मराठवाड्यात ३२ लाख हेक्टरवरच पेरण्या होऊ शकल्या.त्यामुळे विभागातील उर्वरित ११ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीची शक्यता कमी झाली असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्पन्न २० टक्क्यांपर्यंत घटणार मराठवाड्यात यंदा ७२ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. जून महिना कोरडा गेल्यामुळे महिनाभर उशिराने ही पेरणी झाली. त्यामुळे यंदा सरासरी उत्पन्नात १५ ते २० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता असल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हासरासरी प्रत्यक्ष पेरणीटक्केवारीक्षेत्र (हे.)झालेलीऔरंगाबाद६२९९२७४८१०५८७६ जालना५६१४५५३४३४७८६१परभणी५३८२००३०८४८५५७हिंगोली३४०३००१९३२३८५६नांदेड७५५२००४७५९००६३बीड६१९८४५६२१३०९१०१लातूर५५६७००४९७९१९८९ उस्मानाबाद३९२४००२७९९००७१ एकूण ४३९४०१७३२०१३१७७२केवळ बीड जिल्ह्यात १०० टक्के पेरण्या झाल्या आहेत. बीड जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ६ लाख १९ हजार हेक्टर आहे. त्या तुलनेत ६ लाख २१ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे.
मराठवाड्यात आतापर्यंत ७२ टक्के क्षेत्रावरच पेरणी
By admin | Published: July 30, 2014 1:05 AM