‘‘एसपीए’ही पळविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 01:00 AM2017-12-24T01:00:56+5:302017-12-24T01:01:00+5:30

देशातील शिखर संस्था असलेली ‘आयआयएम’ तीन वर्षांपूर्वी नागपूरला अक्षरश: पळवून नेण्यात आली. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी शासनाने स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्ट (एसपीए) ही दुसरी मोठी संस्था औरंगाबादला मंजूर करण्यात आली.

 'SPA' also ran? | ‘‘एसपीए’ही पळविले?

‘‘एसपीए’ही पळविले?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : देशातील शिखर संस्था असलेली ‘आयआयएम’ तीन वर्षांपूर्वी नागपूरला अक्षरश: पळवून नेण्यात आली. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी शासनाने स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्ट (एसपीए) ही दुसरी मोठी संस्था औरंगाबादला मंजूर करण्यात आली. मागील तीन वर्षांमध्ये ही संस्था उभारण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट आता एसपीए ही नावाजलेली संस्था पुण्याला पळवून नेण्यात आली आहे.
मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: औरंगाबादेत एसपीए संस्थेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असून, तो मंजूरही झाल्याचे नमूद केले होते. स्थानिक आर्किटेक्ट संघटनेने केंद्रात चौकशी केली असता असा कोणताही प्रस्ताव औरंगाबादसाठी मंजूर केला नसल्याचे समोर आले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘औरंगाबादच्या ‘एसपीए’चा प्रस्ताव दिल्लीत पडून’ या मथळ्याखाली १४ डिसेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना एसपीए ही संस्था पुण्याला आणण्यासंदर्भात पत्र दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. स्कूल आॅफ प्लॅनिंगची मागणी औरंगाबादकरांनी केली नव्हती.
तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने आयआयएम या संस्थांसाठी विविध शहरांची निवड सुरू केली होती. तेव्हा देशातील सर्वोच्च शिखर संस्था मराठवाड्याच्या राजधानीत यावी म्हणून जनआंदोलन उभे करण्यात आले. शहरातील विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, व्यापाºयांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा केला होता. एवढ्यानंतरही युती शासनाने मराठवाड्यावर अन्याय केला. आयआयएम ही संस्था चक्क नागपूरला पळवून नेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: औरंगाबादला दुय्यम दर्जाची एसपीए ही संस्था मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. नागरिकांनीही एक मोठी संस्था औरंगाबादला येणार असल्याने समाधान व्यक्त केले.
मागील तीन वर्षांमध्ये संस्था स्थापन करण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाकडून करण्यात येत आहे. औरंगाबादची एसपीए ही संस्थाही पुण्याला पळविण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांची दुटप्पी भूमिका
केंद्र शासनाने मागील आठवड्यात एसपीए औरंगाबादला मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता स्वत: मुख्यमंत्री ही संस्था पुण्याला स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र देतात. ही दुटप्पी भूमिका नाही तर काय म्हणावे, असा संतप्त सवाल स्थानिक आर्किटेक्ट संघटनेचे माजी अध्यक्ष अजय ठाकूर यांनी उपस्थित केला.
माझी प्रामाणिक इच्छा
स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्कि टेक्ट’ ही संस्था औरंगाबादलाच होणार असून, ही शिखर संस्था पुणे किंवा इतर मोठ्या शहरात हलविण्याबाबत केंद्रासोबत कसलाही पत्रव्यवहार झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला बोलताना दिली. ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्ट’ ही संस्था पुण्याला होणार असल्याच्या बातम्या शनिवारी प्रसिद्ध झाल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना नमूद केले की, एसपीए ही संस्था औरंगाबादला स्थापन व्हावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.

Web Title:  'SPA' also ran?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.