व्यंकटेश वैष्णव; बीडजिल्ह्यातील जुन्या लघु सिंचन प्रकल्पांची दुरूस्ती करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली असून यात ३३ जुन्या लघु सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. यासाठी १६ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मंगळवारी येथे दिली. बेलगाव आणि कटवट या प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असल्याचेही ते म्हणाले. जिल्हयात ९९ लघुसिंचन प्रकल्प आहेत. यामध्ये २०८.०७ दलघमी पाणी साठण्याची क्षमता आहे. मात्र मागील तीन वर्षापासून जिल्ह्यात अल्प पाऊस होत असल्याने लघुसिंचन प्रकल्पांमध्ये पाणी साठा होणे देखील अवघड झालेले आहे. त्यातच लघु सिंचन प्रकल्पांची पडझड झालेली असल्यामुळे पाणी साठवून रहात नाही.सध्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने नव्या सिंचन योजना सुरू करण्यासह जुन्या प्रकल्पांचीही दुरूस्ती करण्याची मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील बेलगाव व कटवट सिंचन प्रकल्पाची दुरूस्ती करण्यात आली असून दुरूस्तीसाठी मंजूर १६ कोटीपैकी तीन कोटींचा खर्च झाला आहे. ४बीड जिल्ह्यातील बहुतांश लघुसिंचन प्रकल्पांच्या सांडव्याचे बांधकाम तीस ते पस्तीस वषापूर्वी झालेले आहे. बांधकाम जुने झालेले असल्याने बहुतांश ठिकाणच्या सांडव्यांना तडे गेले आहेत. यामुळे या तलावांची पुर्नबांधणी केली तर शेकडो हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यास मदत होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. ४ पुढील तीन ते चार महिन्यांमध्ये उर्वरीत लघु प्रकल्पांची दुरूस्ती करण्यात येणार आहे. यामध्ये बीड, अंबाजोगाई, वडवणी, शिरूर कासार, पाटोदा आदी तालुक्यांचा समावेश आहे, असेही ते म्हणाले. दुरूस्ती का?४काही प्रकल्पांत गाळ साचलेला आहे, तर काही तलावांचे सांडवे तुटलेले आहेत तसेच अनेक बंधाऱ्यांना दरवाजे नसल्यामुळे पाणी न साठता वाहून जात आहे. त्यामुळे दुरुस्तीची आवश्यकता निर्माण झाली आहे. या प्रकल्पांची तातडीने दुरूस्ती केली तर भविष्यात संबंधीत प्रकल्पात २०८.०७ दलघमी पाणी साठू शकतो. याचाच विचार करून शासनाने जुन्या सिंचन प्रकल्पांना नवसंजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे़ अडीच हजार दलघमी पाण्याची होणार बचत४लघु प्रकल्पाला गळती लागल्या मुळे पावसाळ्यात एका तलावातून अंदाजे ०.७५ दलघमी पाणी वाया जाते. दुरूस्तीमुळे ३३ प्रकल्पांमधील अडीच हजार दलघमीच्या जवळपास पाणी बचत होणार असल्याचे शासनाच्या अहवालात म्हटले आहे.
जुन्या ३३ लघुसिंचन प्रकल्पांच्या दुरुस्ती मोहिमेला वेग
By admin | Published: January 14, 2015 12:25 AM