SSC Result : औरंगाबाद विभागाचा ९९.९६ टक्के निकाल; विशेष प्राविण्यात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:02 PM2021-07-16T16:02:14+5:302021-07-16T16:04:14+5:30

SSC Result of Aurangabad Division : औरंगाबाद विभागात नियमित परिक्षार्थी म्हणून १ लाख ७६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७६ हजार २९० विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले.

SSC Result: 99.96% result of Aurangabad division; Most students pass in special privilege | SSC Result : औरंगाबाद विभागाचा ९९.९६ टक्के निकाल; विशेष प्राविण्यात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण 

SSC Result : औरंगाबाद विभागाचा ९९.९६ टक्के निकाल; विशेष प्राविण्यात सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण 

googlenewsNext
ठळक मुद्देविभागात १०६३ पुनर्परिक्षार्थी तर १७४ बहिस्त विद्यार्थी, तर ६७ नियमीत विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत

औरंगाबाद : औरंगाबाद विभागातील १ लाख ७६ हजार २२३ (९९.९६ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालात मुलींनी बाजी मारली असून यंदा ९९.९५ टक्के मुले तर ९९.९७ मुली टक्के मुली दहावी पास झाल्या. तर प्राविण्य श्रेणीत सर्वाधिक तर केवळ उत्तीर्ण श्रेणीत सर्वात कमी विद्यार्थी आहेत.

औरंगाबाद विभागात नियमित परिक्षार्थी म्हणून १ लाख ७६ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ७६ हजार २९० विद्यार्थ्यांचे मूल्यांकन प्राप्त झाले. त्यापैकी १ लाख ७६ हजार २२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. एकूण निकालात ९९.९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात ७५ टक्क्यांपेक्षा अधिक प्राविण्य श्रेणीत ९६,५४२, प्रथम श्रेणी ६० ते ७४ टक्के दरम्यान ७१ हजार ७७४, द्वितीय श्रेणी ४५ ते ५९ टक्के ७ हजार ७२१ तर ३५ टक्के व उत्तीर्ण श्रेणीत केवळ १८६ विद्यार्थी आहेत.

पुनर्परिक्षार्थ्यांत ८ हजार ८७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ८ हजार ८४९ विद्यार्थ्यी प्रविष्ठ झाले असून ७१७२ विद्यार्थई उत्तीर्ण झाले. एकुण ८१.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणी ५९, प्रथम श्रेणी ३४०, द्वितीय श्रेणी ३३३, तर उत्तीर्ण श्रेणीत ६४४० विद्यार्थी आहेत.
कला गुणांसाठी १३ हजार १७४ तर क्रीडा गुणांसाठी ७९० प्रस्ताव आले होते त्याचा आंतर्भाव निकालात करण्यात आलेला आहे. १२६७ जणांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. त्यात अनेकांची कागदपत्रांची पुर्तता नाही. तर काही राखीव निकालातील विद्यार्थी अपघाती, कोरोनामुळे, नैसर्गिक मृत्यू ओढावल्याचेही बोर्डाकडे कळवण्यात आले आहे. असे बोर्डाकडून सांगण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी डाॅ. बी. बी. चव्हाण यांच्यासह बोर्डाचे अधिकारी उपस्थिती होते.

त्रुटी पुर्ण झाल्यावर वाढेल निकाल
विभागात १०६३ पुनर्परिक्षार्थी तर १७४ बहिस्त विद्यार्थी, तर ६७ नियमीत विद्यार्थ्यांचे निकाल राखीव आहेत. त्रुटी पूर्ण झाल्यावर त्यांचा निकाल लागेल. त्यासाठी शाळांशी बोर्डाकडून संपर्क साधून त्रुटींची पुर्तता करण्याचे सांगण्यात येत आहे. त्या त्रुटींच्या पुर्ततेनंतर निकालाचे प्रमाण वाढेल. गुणपत्रिकेत त्रुटी, शंका वाटल्यास शाळांशी संपर्क साधावा, मुल्यांकनाची सर्व प्रक्रीया शाळा स्तरावर झाली आहे. पुनर्मुल्यांकनाची सुविधा या परिक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नसेल. असे बोर्डाच्या विभागीय सचिव सुगता पुन्ने यांनी सांगितले.

विभागात श्रेणीनिहाय उत्तीर्ण विद्यार्थी
जिल्हा - प्राविण्य श्रेणी - प्रथम श्रेणी - द्वितीय श्रेणी - उत्तीर्ण
औरंगाबाद -३३,११६ -२६,६२८ -३,०८२ -७८
बीड -२५,८६२ -१३,५६१ -१,१११ -१८
परभणी -१५,३३८ -१०,४०४ -१,१७६ -१४
जालना -१४,७६१ -१३८१९ -१,७७० -६७
हिंगोली -७४९५ -७३६२ -५८२ -९

Web Title: SSC Result: 99.96% result of Aurangabad division; Most students pass in special privilege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.