सिंचनप्रश्नी जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:06 AM2021-06-16T04:06:40+5:302021-06-16T04:06:40+5:30

माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ जयंत पाटील यांना भेटले. दिलेल्या निवेदनात मन्याड धरणाची उंची ...

Statement to the Minister of Irrigation Water Resources | सिंचनप्रश्नी जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

सिंचनप्रश्नी जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

googlenewsNext

माजी आ. भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ जयंत पाटील यांना भेटले. दिलेल्या निवेदनात मन्याड धरणाची उंची वाढवावी, तसेच वाया जाणारे पाणी अडविण्यासाठी त्यावर साखळी बंधारे बांधावेत, हत्ती घोडा साठवण तलाव व चांदेश्वरी साठवण तलाव तसेच प्रलंबित असणारे लघु प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे. यावेळी बैठकीसाठी जलसंपदा खात्याचे सचिव मुंडे, तसेच विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रतापराव निंबाळकर, बाजार समितीचे सभापती भागिनाथ मगर, उपसभापती राजेंद्र मगर, खरेदी-विक्री उपसभापती मंजाहरी गाढे, विधानसभा अध्यक्ष साईनाथ मतसागर, कार्याध्यक्ष उत्तम निकम, रिखब पाटणी, बाळासाहेब भोसले, दत्तू त्रिभुवन, सूरज पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, सरपंच राजू साळुंखे, उत्तम कोल्हे आदींची उपस्थिती होती.

फोटो : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ.

140621\img-20210614-wa0180.jpg

माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर व पदाधिकारी च्या वतीने जलसंपदा मंत्री यांना निवेदन देताना

Web Title: Statement to the Minister of Irrigation Water Resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.