दादागिरी थांबवून शिस्तीने वागा,नंतरच मीटर दरवाढ; जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांचे टोचले कान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 01:34 PM2022-07-27T13:34:56+5:302022-07-27T13:35:52+5:30

जिल्ह्याधिकाऱ्यांची रिक्षाचालकांना विविध सूचना; रिक्षाचालकांकडून मीटर दरवाढीची मागणी होत आहे परंतु मीटर दरवाढीचा बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.

Stop bullies and be disciplined, then increase meter rates; Collector shouts on rickshaw drivers | दादागिरी थांबवून शिस्तीने वागा,नंतरच मीटर दरवाढ; जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांचे टोचले कान

दादागिरी थांबवून शिस्तीने वागा,नंतरच मीटर दरवाढ; जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांचे टोचले कान

googlenewsNext

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनवर रिक्षाचालक दादागिरी करत असल्याची तक्रारी होतात. रस्त्यावर कुठेही रिक्षा उभ्या केल्या जातात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे रिक्षाचालकांनी आधी वाहतूक नियमांचे पालन करावे, शिस्तीने वागावे, त्यानंतर मीटर दरवाढीचा विचार केला जाईल, अशी सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रिक्षाचालकांना केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी रिक्षाचालकांच्या समस्या, वाहतूक नियमांचे पालन, वाहतूक आणि सुरक्षेबाबत शिस्तीच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय मेत्रेवार, रिक्षाचालक संघटनेचे निसार अहेमद खान, नाहीद फारुकी, जाकेर पठाण, शेख लतीफ, मनोज जैस्वाल, रमाकांत जोशी, मोहंम्मद बशीर, मोहंम्मद फारुख रोशन, राजेश रावळकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांच्या विविध समस्या जाणून घेत सूचना केल्या. गेल्या काही महिन्यांत इंधन दरात वाढ झाली आहे. त्यामुळे रिक्षाचालकांकडून मीटर दरवाढीची मागणी होत आहे परंतु मीटर दरवाढीचा बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे रिक्षाचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

मीटर दरवाढीचा लवकरच निर्णय
मीटर दरवाढीचा प्रस्ताव आहे. त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल. शेअर रिक्षालाही परवानगी दिली जाणार आहे. रिक्षाचालकांनी शिस्तीचे पालन केले पाहिजे. गणवेश घातला पाहिजे. बॅच लावला पाहिजे. प्रवाशांबरोबर योग्य पद्धतीने वागले पाहिजे. यासंदर्भात सूचना केल्या आहेत.
- सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी

८० टक्के रिक्षाचालक नियमाने वागतात
शिस्तीचे पालन करावे, तरच मीटर दरवाढ केली जाईल, असे सांगितले परंतु रिक्षाचालकांना उपाशी ठेवून शिस्त लावण्याचा प्रयत्न प्रशासनाने करू नये. आधी मीटर दरवाढ द्यावी, रिक्षाथांबे द्यावे. ८० टक्के रिक्षाचालक शिस्तीचे पालन करतात, असे रिक्षाचालक-मालक महासंघाचे निसार अहेमद खान म्हणाले.

रिक्षाचालकांनी करावी ही सुधारणा
- गणवेश घालूनच रिक्षा चालवणे.
- क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवू नये.
- वाहतूक नियमांचे पालन करावे.
- रस्त्यावर कुठेही रिक्षा उभी करू नये.
- प्रवाशांबरोबर सौजन्याने वागावे.

Web Title: Stop bullies and be disciplined, then increase meter rates; Collector shouts on rickshaw drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.